शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सून बरसला मात्र गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा पाऊसच पडला नाही, हे आतापर्यंत नोंदविलेल्या ९३.८० मि. मी. पावसातून स्पष्ट झाले. पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे. 

१,४२६ हेक्टर क्षेत्रात पऱ्हे भरलेधानाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ८४ हजार २९० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ एक हजार ४२६ हेक्टरवर धानाच्या पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.८३ टक्के आहे. सोयाबीनचे प्रत्यक्ष क्षेत्र ६५ हजार ६२ इतके आहे. पाऊस न झाल्याने सोयाबीनची लागवड झालेली नाही.

जिल्ह्यात ९३.८० मिमी पाऊस बरसला- मूल, सावली, सिंदवाही, ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यांत भातशेती केली घेतले. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. १ ते २३ जूनपर्यंतच पावसाने हजेरी लावली. त्याची सरासरी ९३.८० मिमी आहे. २३ दिवसात केवळ ५१.१२ टक्के पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

कापूस लागवडीवरही अनिष्ट परिणामकापसाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ७७ हजार ३८५ हेक्टर आहे. त्यापैकी एक हजार ७४३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. केवळ चंद्रपूर आणि राजुरा तालुक्यांत कापसाची लागवड केली आहे. अन्य तालुक्यांमधील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी   चंद्रपूर जिल्ह्यात गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी पाऊस बरसला होता. मात्र, यंदा केवळ ९३.८० मिमी  पडल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती