शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यप्राण्यांसाठी ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:11 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणारे ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणारे ठरले आहे.महाराष्ट्र शासनाने बफर व कोअर अशी विभागणी करून ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पात सहा परिक्षेत्रांची निर्मिती केली. यात मूल परिक्षेत्रात ९६.७० चौ.कि.मी. क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा वावरही लक्षवेधी असल्याचे या परिक्षेत्रात दिसून येते. पावसाळा व हिवाळा या दोन ऋतुंमध्ये वन्यप्राण्यांना पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जलस्त्रोत उपयुक्त ठरत आहेत. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यास जंगलाजवळील काही भागात पाणी मिळणे दुरापास्त होते़ पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असते. वनविभागाने काही ठिकाणी सौरपंप बसवून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची आवश्यकता भासते़सोमनाथ, भादुर्णी परिसरात तलाव असून त्यातील पाण्याचा आता उपयोग होत आहे. पडझरी, शिवापूर चक या परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असल्याने समस्या सुटली. डोंगरदऱ्यातून बरेच पाणी झिरपते. त्यातून वन्यप्राण्यांना तृषा भागविता येते. या परिक्षेत्रातील बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांमुळे वन्यप्राण्यांची अडचण दूर झाली आहे.झऱ्यामुळे टळले जलसंकटउन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कमी होतात. पण, मूल वन क्षेत्रातील झऱ्यातून पाणी सतत वाहत असल्यामुळे वन्य प्राण्यांना तृष्णा भागविणे शक्य झाले़ वन्यप्राण्यांची भटकंती थांबली. यासाठी नैसर्गिक जल स्त्रोत महत्त्वाचे ठरले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत मुबलक प्रमाणात असल्याने वन्य प्राण्यांसाठी वरदानच ठरत असल्याचे दिसून येत आहे़

टॅग्स :Waterपाणी