शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक बस निवारे

By admin | Updated: July 4, 2016 00:44 IST

शहरातील फुटपाथ रस्त्यांचा ‘लूक’ बदलणारा प्रकल्प चद्रपूर महानगरपालिकेने हाती घेतला आहे.

रस्त्यांचा ‘लूक’ बदलणार : सीसीटीव्ही कॅमेरे, स्टील खुर्च्या, कचरा कुंड्या लागणार मिलिंद कीर्ती चंद्रपूरशहरातील फुटपाथ रस्त्यांचा ‘लूक’ बदलणारा प्रकल्प चद्रपूर महानगरपालिकेने हाती घेतला आहे. शहरातील नागरिकांकरिता बस थांबे आहेत. पण निवारे नाहीत. सिटी बस कुठे थांबते, याचा पत्ता नाही. कडक उन्हात शहर बसची वाट पाहावी लागते. आता नागरिकांची ही गैरसोय दूर होणार आहे. येत्या आठवड्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरप्रमाणे चंद्रपूरच्या फुटपाथवर अत्याधुनिक शहर बस निवारे उभारण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. शहरात २८ निवारे उभारण्यात येत आहे.मुंबर्ई, नागपूर येथील फुटपाथवर अत्याधुनिक डिस्प्लेसह शहर बस निवारे पाहून त्या प्रकारचा प्रस्ताव अयुबखान व भोला मडावी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला २४ जुुलै २०१५ रोजी सादर केला होता. त्या प्रस्तावाचा उपमहापौर वसंत देशमुख यांनी पाठपुरावा केल्यानंतर ३० जून २०१६ रोजी मान्यता देण्यात आली. चंद्रपूर मनपाचे आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय इंगोले यांनी पायलट प्रोजेक्ट उभारण्याचा चांदा एजन्सीशी करार केला आहे. त्यानुसार, वार्षिक पाच हजार रुपये लीजवर महात्मा गांधी चौक येथे पथदर्शी शहर बस निवारा तयार करण्यात येणार आहे. त्यावर महापौर-उपमहापौर यांच्या छायाचित्रांसह ‘चंद्रपूर महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे’, अशी जाहिरात प्रकाशित करण्यात येईल. ही जाहिरात १५ दिवस राहणार असून एजन्सी कोणतेही शुल्क आकारणार नाही. तत्कालिन मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या कार्यकाळात शहर बस निवारे उभारण्याचा प्रस्ताव चांदा अ‍ॅड मल्टी एजन्सीने सादर केला होता. त्यावेळी शंभरकर यांनी शाळा-महाविद्यालयांसमोर शहर बस निवारे उभारण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार लोकमान्य टिवळ शाळा, चांदा पब्लिक स्कूल आदी ठिकाणी शहर बस निवारा उभारण्यात येणार आहे. पथदर्शी फुटपाथ रस्त्यावर निवारा ३ फूट रुंद व २० फूट लांब असा राहणार आहे.शहर बस निवाऱ्यांचे स्थळशहर बसच्या २९ थांब्यांवर हे बस निवारे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये गांधी चौक येथे पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहे. याशिवाय बागला चौक, लोकमान्य टिळक शाळा, जयंत टॉकीज, जटपुरा गेट चौक, बस स्टँड, वाहतूक कार्यालय, मातोश्री विद्यालय, एस.टी. वर्क शॉप, खत्रा कॉलेज, दुर्गापूर, उर्जानगर, आझाद हिंद चौक, ज्युबिली हायस्कूल, रामनगर पोलीस स्टेशन, प्रशासकीय भवन, बंगाली कॅम्प-मूल रोड, डॉ. आंबेडकर नगर, जुनोना चौक, पाणी टाकी, जनता कॉलेज, कुंदन प्लाझा, पडोली, रामनगर-केवलराम चौक आणि चांदा पब्लिक स्कूल येथे निवारे प्रस्तावित करण्यात आले आहेत.अत्याधुनिक साहित्य या शहर बस निवाऱ्यांसदर्भात एजन्सीचे संचालक भोला मडावी यांनी सांगितले की, बस निवाऱ्यावर ईलेक्ट्रिक मीटर, जाहिरात डिस्प्ले, १६ स्टील खुर्च्या, डस्टबीन, सीसीटीव्ही कॅमेरे आदी लावण्यात येणार आहे. पथदर्शी शहर बस निवारा मनपाला पसंत पडल्यास इतर ठिकाणी शहर बस निवारे उभारण्यात येतील. पथदर्शी निवारा एजन्सी स्वखर्चाने उभारणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिला-पुरुषांना बसण्याची व्यवस्थाबस निवाऱ्यामध्ये महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका बाजूला महिलांकरिता आठ स्टील खुर्च्या लावण्यावर मधात कचरा कुंडी ठेवण्यात येईल. त्यानंतर पुरुषांकरिता आठ स्टील खुर्च्या राहतील. पथदर्शी शहर बस निवारा उभारण्यास मनपाच्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली आहे. एजन्सीने बेसिक मॉडेल तयार केल्यावर ते मान्य करण्यात आल्यास इतर ठिकाणी बस निवारे उभारण्याकरिता निविदा मागविण्यात येतील. त्यामध्ये जी एजन्सी मनपाला अधिक उत्पन्न देईल, त्यांना बस निवारे उभारण्याचा प्रकल्प देण्यात येईल.- विजय इंगोले, उपायुक्त, चंद्रपूर मनपा, चंद्रपूर.