शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

निकाल लागला, पालकांसह विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

सध्या कोरोना  संकट आहे. त्यामुळे नियम पाळून विद्यार्थ्यांना  विविध शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढावी लागणार आहे. शासकीय कागदपत्र काढताना कोणती काळजी घ्यायची तसेच यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागते यासंदर्भात विद्यार्थ्यांनी खचून न जाते पुढीलप्रमाणे कागदपत्र गोळा करावे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी कागदपत्र गोळा  करताना चांगलीच दमछाक होत आहे. सध्या कोरोना  संकट आहे. त्यामुळे नियम पाळून विद्यार्थ्यांना  विविध शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढावी लागणार आहे. शासकीय कागदपत्र काढताना कोणती काळजी घ्यायची तसेच यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागते यासंदर्भात विद्यार्थ्यांनी खचून न जाते पुढीलप्रमाणे कागदपत्र गोळा करावे.

नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट (उच्च उत्पन्न गटात नसल्याबाबतचा दाखला)- आवश्यक कागदपत्रे- जातीचा दाखला- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र- आठ लाखांच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला- शाळा सोडल्याचा दाखला- या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.

असे मिळवा विविध दाखले जातीचा दाखला- कुटुंबातील व्यक्तीचा सन १९६७ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.- सन १९६७ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६७ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक-  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.- विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती

(एसबीसी, व्हीजेएनटी)- कुटुंबातील ज्याचा सन १९६१ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.- सन १९६१ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६१ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतकडून मिळणारे घरठाण पत्र (असेसमेंट उतारा)- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.

या दाखल्यासाठी प्रतिज्ञापत्रजातीचा दाखला आणि नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट), तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईलसाठी स्व:घोषणापत्र (सेल्फ डिक्लरेशन) द्यावे लागते. त्याबाबतची प्रक्रिया महा ई-सेवा केंद्रात होते.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एस.सी., एस.टी.) -  कुटुंबातील ज्याचा सन १९५० पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावा. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.- सन १९५० पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९५० पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी  आवश्यक कागदपत्रे- उत्पन्नाचा तलाठ्यांंचा दाखला, शहरातील असल्यास तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला- नोकरी असल्यास (आयकर विवरणपत्र)- शेती असल्यास (सातबारा)-  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र- या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी शासनाने १५ दिवसांची मुदत दिली आहे.

डोमिसाईल- (वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला)- मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक- शाळा सोडल्याचा दाखला- १५ वर्षांचा रहिवास सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (वीज बिल, असेसमेंट उतारा, सातबारा, आदी)- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.- या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्राकडे अर्ज करावा. संबंधित दाखला मिळण्याची मुदत १५ दिवस आहे.

अर्ज करण्याची अशी आहे प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात अर्ज जमा करावा.  जातीच्या दाखल्यासाठी १९६७, १९६१ आणि १९५० ही वर्ष मानीव दिनांक पुरावा ग्राह्य धरले आहेत. या दिनांकांपूर्वी जो रहिवास पुरावा असेल. त्या (उदा. सातबारा अथवा घरठाण पत्रक जर, दुसऱ्या तालुक्यातील असेल आणि सध्या अर्जदार हा चंद्रपुरात राहत असेल, तर अर्जदाराला सातबारा अथवा घरठाण पत्रक असलेल्या तालुक्यात अर्ज करावा लागतो.)  ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संंबंधित नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कार्यवाही पूर्ण केल्या जाते. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन डिजिटल  स्वाक्षरी झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातून जातीचा अर्जदाराला दाखला मिळतो. पालकांनी प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्र जावून दाखला काढावा, दलालांपासून सावध  राहून आपले नुकसान टाळावे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा