गिरीधर बोबडे : रासेयो स्वयंसेवकांंची कार्यशाळागडचांदूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजसेवा करावी, असे प्रतिपादन प्राचार्य गिरीधर बोबडे यांनी केले.ते स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो विभागाच्या वतीने आयोजित रासेयो स्वयंसेवकाच्या कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपमुख्याध्यापिका प्रा. रश्मी भालेराव, रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा. विजय आकनूरवार, प्रा. आशिष देरकर, प्रा. प्रशांत पवार, प्रा. प्रदीप परसूटकर, प्रा. देवेंद्र हेपट, प्रा.सुधीर थिपे, प्रा. बाळू उमरे आदी उपस्थित होते. प्रा. आकनूरवार यांनी रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचे सांगितले. प्रा आशिष देरकर यांनी रासेयोचे महत्त्व पटवून दिले.याप्रसंगी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधी गणपत मोहुर्ले, महिला प्रतिनिधी भाग्यश्री बलकी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी अंकिता लांडे तसेच तिर कमिटीमध्ये निर्दोष धोटे, पल्लवी तुपसुंदर, कल्याणी शेंडे यांची निवड केली. संचालन प्रा. सुधीर थिपे यांनी केले आभार प्रा. बाळू उमरे यांनी मानले. (वार्ताहर)
रासेयोच्या माध्यमातून समाजसेवा करावी
By admin | Updated: August 7, 2016 00:43 IST