शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

स्माईल प्लीज म्हणणाऱ्याचेच हरविले हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

मोबाईल क्रांतीमुळे फोटोग्राफी व्यवसाय असाही अडचणीत आला आहे. घरगुती कार्यक्रमापासून तर विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आता मोबाईलमध्ये काढले जात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांची मदार लग्नसराईवरच अवलंबून आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे हा व्यवसाय संपुष्टात आला आहे. अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही परत करावी लागली आहे. मुंज, वाढदिवसाच्या लहान-मोठे ऑर्डर मिळणे बंद झाले.

ठळक मुद्देफोटोग्राफी व्यवसायावर संकट, लग्नसराई बुडाल्याने उदर निर्वाहाचा प्रश्न

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ऐन लग्नसराईत कोरोनाचे संकट उद्भवल्याने फोटोग्राफीचा व्यवसाय करताना इतरांना स्माईल ‘स्माईल प्लीज’ म्हणणाऱ्यांचेच कारोनाने हसू हरविले आहे. लॉकडाऊनमुळे यंदाचा व्यवसाय बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅमेºयासाठी घेतलेले कर्ज, दुकान भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन या चिंतेने फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे हैराण झाले आहेत.मोबाईल क्रांतीमुळे फोटोग्राफी व्यवसाय असाही अडचणीत आला आहे. घरगुती कार्यक्रमापासून तर विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आता मोबाईलमध्ये काढले जात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांची मदार लग्नसराईवरच अवलंबून आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे हा व्यवसाय संपुष्टात आला आहे. अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही परत करावी लागली आहे. मुंज, वाढदिवसाच्या लहान-मोठे ऑर्डर मिळणे बंद झाले. त्यात फोटोग्राफी व्यवसाय आता दिवाळीपर्यंत पुन्हा उभारी घेण्याची शक्यता नाही. ग्राहकांकडून येणारी उधारी मिळत नाही. दुसरीकडे बँकेचे हप्ते, दुकान भाडे यासह दैनंदिन खर्च सुरूच असल्याने जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकार हवालदिल झाले आहेत.कोट्यवधींची उलाढाल ठप्पएका लग्नाच्या फोटो व व्हिडिओसाठी सरासरी २० हजार ते ५० हजारांपर्यंत दर आकारला जातो. एप्रिल ते जुलै दरम्यान लग्नाच्या सर्वाधिक तिथी असतात. यावेळी सर्वाधिक लग्न लागतात. त्यातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. ऐन लग्नसराईत लॉकडाऊन लागल्याने व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे शेकडो फोटोग्राफर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री स्वत: उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांनी फोटोग्राफर्सना मदतीचा हात देण्याची मागणी केली जात आहे.फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी व एलईडी, लाईव्ह सेटअप असणारे, लॅबचालक व अल्बम विक्रेतेही, अडचणीत आले आहे. अनेकांनी या व्यवसायात गुंतवणूक केली. मात्र, संपूर्ण लग्न सराई वाया गेल्याने स्थिती बिकट झाली आहे.- रविंद्र वाळके, फोटोग्राफी व्यावसायिक, खडसंगी

टॅग्स :marriageलग्न