शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

वेकोलिच्या माध्यमातून दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार

By admin | Updated: November 19, 2015 01:17 IST

वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेडच्या माध्यमातून चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वेकोलिचे अध्यक्ष ...

विदर्भातील लघु उद्योगांना अ‍ॅन्सिलरी युनिटचा दर्जा : सुधीर मुनगंटीवार आणि वेकोलिचे सीएमडी यांच्या बैठकीत निर्णयचंद्रपूर : वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेडच्या माध्यमातून चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत घेण्यात आला. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना वर्षभरात विविध विभागांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.१७ नोव्हेंबर रोजी वेकोलिच्या नागपूर मुख्यालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांची बैठक झाली. या बैठकीत वेकोलिच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या  विविध  विषयांवर विस्तृत चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीमुळे नागरिकांना सहन करावे लागणारे प्रदूषण लक्षात घेता सामाजिक दायित्व म्हणून दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करून त्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना प्रशिक्षित करण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत केली. त्यानुसार दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय प्रबंध निदेशक मिश्रा यांनी घेतला.‘मेक इन चंद्रपूर’ या घोषणेच्या अनुषंगाने वेकोलिने विदर्भातील लघु उद्योगांना ‘अ‍ॅन्सिलरी युनिट’ म्हणून दर्जा देण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विदर्भातील लघु उद्योगांना अ‍ॅन्सिलरी युनिट म्हणून रजिस्ट्रेशन देण्यात येईल, असे आश्वासन वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांनी दिले.या माध्यमातून ४०० च्यावर वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या विदर्भातील अनेक लघु उद्योजकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)चिमूरच्या क्रीडांगणासाठी पाच कोटींचा निधीचिमूर येथे १९९४ मध्ये वेकोलिच्या माध्यमातून क्रीडांगणाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र निधीच्या उपलब्धतेअभावी या क्रीडांगणाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. या क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. या क्रीडांगणासाठी ५ कोटी रुपये वेकोलिच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांनी यावेळी सांगितले.