शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील नोकरभरती प्रकरणाला एसआयटी चौकशीने वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:41 IST

चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण : माजी संचालकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, 'नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात 'एसआयटी "ने नेमके हेच टायमिंग साधल्याने माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया गतिमान केली असून, आणखी काही माजी पदाधिकाऱ्यांनाही लवकरच नोटीस बजावल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांची निवडणूक गेल्या आठवड्यात आटोपली. येत्या आठवडाभरात बँकेच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल. एकीकडे बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली असताना नोकरभरती प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागू नये, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका माजी अध्यक्षाने सोमवारी (दि. १४) भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचीही चर्चा रंगत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकरभरती प्रकरणात काही संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आणखी काही संचालकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते. नोकरभरतीत बँकेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी संचालक शेखर धोटे, संदीप गड्डमवार, दामोदर मिसार, तत्कालीन उपाध्यक्ष यशवंत दिघोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी राजीनामा दिला होता. या राजीनाम्यामागे चौकशीचा बडगा असल्याची चर्चा होती.

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीनंतर भाजपने अध्यक्ष पदासाठी ताकद पणाला लावली. त्यासाठीच शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. याचदरम्यान 'एसआयटी'नेही टायमिंग साधल्याने अन्य संचालकांसाठी हा इशारा असल्याची चर्चा आहे.

नोकरभरती प्रकरणी राज्य सरकारने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांची चौकशी प्रमुखपदी नियुक्त केली असून त्यांनी चौकशीचा वेग वाढविला आहे.

चौकशी अधिकाऱ्यांनी सहकार मंत्र्यांची घेतली भेटउपविभागीय पोलिस अधिकारी तथा चौकशी अधिकारी यादव यांनी मुंबईत सहकार मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पोलिस चौकशीसाठी गेले होते. तथापि याबाबतीत कमालीची गुप्तता पाळली जात असून, सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस प्रशासनातील सूत्राने सांगितले.

'सीआयडी' चौकशी करा -सुधीर मुनगंटीवारआमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवरून नोकरभरती चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली. मात्र, पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी सोपवल्याने मुनगंटीवार यांनी निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून 'सीआयडी' चौकशीची मागणी केली. बुधवारी (दि. १६) त्यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना बदलण्याची विनंती केली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर