शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची किडनी विक्री प्रकरणात एसआयटी गठीत ! मानवी अवयव तस्करीचे रॅकेट असल्याची शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:25 IST

Chandrapur : एक लाखाच्या अवैध सावकारी कर्जापासून सुरू झालेल्या प्रकरणात नागभीड तालुक्यातील रोशन कुळे या शेतकऱ्याला आठ लाखांत किडनी विकावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एक लाखाच्या अवैध सावकारी कर्जापासून सुरू झालेल्या प्रकरणात नागभीड तालुक्यातील रोशन कुळे या शेतकऱ्याला आठ लाखांत किडनी विकावी लागली. या गंभीर प्रकरणाच्या तपासाला वेग देण्यात आला असून, यासाठी शुक्रवारी (दि.१९ रोजी) विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी सर्वकष चौकशी करणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

या विशेष तपास पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी सत्यजीत आमले, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल कचोरे व दोन पोलिस अधिकारी, सायबर पोलिस निरीक्षक सुनील गाडे, पोलिस निरीक्षक ब्रह्मपुरी प्रमोद बानबले यांचा समावेश आहे.

आणखी दोन संशयितांची नावे पुढे

या प्रकरणात किडनी काढण्याशी संबंधित डॉ. क्रिष्णा हे नाव आधीच तपासात पुढे आले असून, आता आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे समजते.या संशयितांची भूमिका काय होती, याबाबत तपास सुरू असून, वैद्यकीय कागदपत्रे आणि संपर्क साखळीची पडताळणी केली जात आहे.

शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी

शुक्रवारी पोलिसांनी पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरले असून, चौकशीदरम्यान संवेदनशीलतेची काळजी घेतली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अटकेतील पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

बँकांना नोटीस, त्या घटनास्थळाचा पंचनामा

सावकार आणि पीडित शेतकऱ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती बँकांना नोटीस बजावून मागितली आहे. तसेच शेतकऱ्याला मारहाण केलेल्या घटनास्थळाचाही पंचनामा करण्यात आला आहे.

'लोकमत'च्या वृत्तांनी पोलिसांना मिळाली दिशा

कंबोडिया देशाशी जुळलेले हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी अवयव तस्करीच्या दिशेने जात असल्याची बाब सर्वप्रथम लोकमतने पुढे आणली. यानंतर खऱ्या अर्थाने तपासाची दिशा बदलली.

तपासाकडे लागले लक्ष

पीडित शेतकऱ्याने किती रक्कम घेतली, किती परतफेड केली, कोणत्या स्वरूपात पैसे दिले, याचा संपूर्ण आर्थिक हिशेब तपासला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात तपासातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात एसआयटीच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याप्रकरणात आतापर्यंत पाच सावकारांना अटक करण्यात आली. या सर्वांची पोलिस कोठडी २० एप्रिलला संपणार असून ती न्यायालयात वाढवून मागण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : SIT formed in farmer's kidney sale case; Trafficking suspected.

Web Summary : A Special Investigation Team (SIT) is formed to probe the farmer's kidney sale case linked to illegal lending and suspected human organ trafficking. The SIT will investigate financial transactions, medical documents, and potential international connections. Five lenders have been arrested and are being investigated.
टॅग्स :Farmerशेतकरी