शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुम्हीच म्हणाल ‘ट्रेनला प्रवासी मिळत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.  या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात नियमित ट्रेन सुरु करण्याची वेळ आल्यास प्रवासी मिळत नसल्याची ओरड अधिकारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कोरोना संकटापासून बंद आहे. ती आजही सुरु झाली नाही. परिणामी येथील प्रवाशांना मुंबईला जाणे कठीण झाले आहे. दरम्यान, रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.  या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात नियमित ट्रेन सुरु करण्याची वेळ आल्यास प्रवासी मिळत नसल्याची ओरड अधिकारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेगाव, शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, समर स्पेशल ट्रेनला शेगाव, मनमाळ आणि जवळगाव येथे स्टाॅप दिले नाहीत. त्यामुळे ट्रेन असूनही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे स्टॉप देऊन आठवड्यातून किमान तीन दिवस ट्रेन चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.-श्रीनिवास सुंचूवारझेडआरयुसीसी सदस्य, चंद्रपूर

सेवाग्राम अजूनही बंदच

औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर ते मुंबई असा प्रवास करणारे बरेच प्रवासी आहेत. मात्र, कोरोना संकटापासून सेवाग्राम ही मुंबईला जाण्यासाठी असलेली हक्काची ट्रेन बंद करण्यात आली. 

शेगाव, मनमाळ, जळगावला थांबा द्यामुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेन नसल्याने रुग्णांचेही बेहाल होत आहेत. दरम्यान, यावर उपाय म्हणून बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनल (साप्ताहिक) ट्रेन दर बुधवारी सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन बुधवारी १२ वाजताच्या सुमारास बल्लारशाह येथे पोहोचत असून, बुधवारीच १.४० वाजता मुंबईसाठी निघते. मात्र, या ट्रेनला शेगाव, मनमान, जवळगाव येथे स्टाॅप देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेगाव, शिर्डी, जळगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांनी काय करावे, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, शेगाव, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, ट्रेनच नसल्याने त्यांनासुद्धा जाता येत नाही. विशेष म्हणजे, सेवाग्राम ट्रेन सुरु असताना या स्ट्राॅपवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करीत होती. आता रेल्वेने नियमित ट्रेन सुरु करण्याचा  विचार केल्यास प्रवासीच मिळत नसल्याचे कारण अधिकारी देऊ शकतात. शेगाव, मनमाळ, जळगाव येथे समर स्पेशल ट्रेनचा स्टाॅप देण्याची मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे