शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Chandrapur; साहेब, आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:12 IST

रोजगाराच्या शोधात दोन महिन्यापूर्वी गोवरी येथे आलेले मजूर राज्यात संचारबंदी असल्याने येथे अडकल्याने त्यांचा सध्यातरी गावाला जाण्याचा मार्ग धूसर झाला असून साहेब,आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......असा आर्त टाहो या मजुरांनी प्रशासनाला केला आहे.

ठळक मुद्देमजुरांचा प्रशासनाला आर्त टाहोतेलंगणातील मजूर अडकले गोवरी गावात

प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर: रोजगाराच्या शोधात दोन महिन्यापूर्वी गोवरी येथे आलेले मजूर राज्यात संचारबंदी असल्याने येथे अडकल्याने त्यांचा सध्यातरी गावाला जाण्याचा मार्ग धूसर झाला असून साहेब,आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......असा आर्त टाहो या मजुरांनी प्रशासनाला केला आहे.पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते,दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते.भगवान भटलाडे,मनीषा भटलाडे,भानुदास जिव्हारे,चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापुर जि.आदिलाबाद(तेलंगणा) व सुशीलाबाई कांबळे,वैष्णवी कांबळे,मनीषा कांबळे सर्व.रा.पल्लेझरीता.जिवती जि.चंद्रपूर हे सर्व मजूर कामाच्या शोधात दोन महिन्यापूर्वी राजुरा तालुक्यातील गोवरी येथे आले होते. संचारबंदीमुळे शेतातील कामे अडली असली तरी शेतातील मजुरांची बहुतांश कामे आता आटोपली आहे.मजूर गावाला जाण्याच्या तयारीत असताना अचानक कोरोना संसगार्ने थैमान घातले असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये धडकताच महाराष्ट्रात या रोगांचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे शासनाने राज्यात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर रोजगारांच्या शोधात आलेले मजूर राजुरा तालुक्यातील गोवरी येथे अडकले आहे.यातील भगवान भटलाडे, मनीषा भटलाडे,भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे हे ४ मजूर तेलंगणा राज्यातील रा.रूपापुर जि.आदिलाबाद येथील आहे तर जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील सुशीला कांबळे,मनीषा कांबळे,वैष्णवी कांबळे या तीनही मायलेकी रोजगाराच्या शोधात आल्या होत्या.परंतु आता राज्यात संचारबंदी लागू झाल्याने त्यांना आपल्या गावाची वाटच धूसर झाली आहे.घरची मंडळी आपल्या परिवारातील सदस्य घरी यावी म्हणून आतुरतेने वाट बघत आहे.या मजुरकडील आता जीवनावश्यक वस्तू संपल्यात जमा आहे.हे मजूर या ठिकाणी पुन्हा काही दिवस राहिले तर त्यांच्या दोन वेळेच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे.सध्या हे सर्व मजूर गोवरी येथील भाऊराव रणदिवे यांचे शेतात आपला संसार थाटून राहत आहे.रणदिवे त्यांचा मुलगा अमित रणदिवे आणि मोरेश्वर रणदिवे यांनी या आलेल्या सर्व मजुरांना सामाजिक बांधिलकी म्हणून राहण्याची सोय करून दिली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यासह जिल्हा व गावाच्या सीमा नागरिकांनी बंद केल्या आहेत.त्यामुळे या मजुरांचा स्वगावी जाण्याचा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाने आम्हाला आमच्या गावाला पोहचवून देण्याची व्यवस्था करून द्यावी अशी आर्त मागणी या मजुरांनी प्रशासनाला केली आहे. साहेब,आम्हाला आमच्या गावी पोहचवा ना.....हा मजुरांचा आर्त टाहो प्रशासनालाही सुन्न करणारा आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस