शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हे तर अंधारात केलेलं पाप; चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:42 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील काही आमदार व मान्यवरांच्या या काही प्रतिक्रिया.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर:गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळाला शनिवारी सकाळी मिळालेल्या कलाटणीने राज्यात चर्चेचा महापूर लोटला आहे. झालेल्या घडामोडी या योग्य आहेत इथपासून ते हा लोकशाहीचा विश्वासघात आहे इथपर्यंतच्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील काही आमदार व मान्यवरांच्या या काही प्रतिक्रिया.हे अंधारातले पाप आहे. मात्र त्यांचा राजकीय डाव फसला आहे. सत्तालोलुप, सत्तेसाठी अस्वस्थ झालेली भाजपा ही कुठल्या थराला जावू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सत्ता मिळविण्यासाठी आकडे नसताना मणिपूर, गोवा, कर्नाटकमध्ये जो प्रकार भाजपाने केला आहे. तोच प्रकार महाराष्ट्रात घडवण्याचा असफल प्रयत्न यांनी केला आणि हे सगळे तोंडघशी पडलेत. सत्तेचं समीकरण मांडताना नैतिकता, नितिमत्ता सर्व यांनी गुंडाळली. सत्तेचा दुरुपयोग करून येनकेनप्रकारे सत्ता मिळवायची या एकाच उद्देशाने ही मंडळी पछाडलेली आहे. आता त्यांच्याकडे कुणीही आमदार राहिलेला नाही. शपथ घेतली खरी परंतु बहुमत सिद्ध करण्याअगोदरच त्यांना राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा असले धंदे करण्याचा प्रयत्न या मंडळींनी करू नये, एवढेच आमचे म्हणणे आहे.- विजय वडेट्टीवार, आमदार तथा काँग्रेसचे विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेता.अजितदादांनी जे काही केले ते फार चुकीचे केलेले आहे. त्यांच्यासोबतच गेलेले काही आमदार परत आले आहेत. अजितदादासुद्धा परत येतील. भाजप कदापि विश्वास मत जिंकू शकणार नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीचीच सत्ता येईल. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. पवार साहेब निर्णय घेतील.- प्रतिभा धानोरकर, नवनिर्वाचित काँग्रेस आमदार, वरोरा विधानसभा मतदार संघ, जि. चंद्रपूर.आज महाराष्ट्रात जे काही घडले आहे ते चुकीचे झालेले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून सत्तेची मोट बांधिली होती. परंतु आज जो घटनाक्रम महाराष्ट्राला बघायला मिळाला तो अनपेक्षित आहे.- सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती. शेतकऱ्यांची दैनावस्था आहे. कामगार, कष्टकऱ्यांचेही प्रश्न गंभीर झालेले आहे. अशा परिस्थितीत कुणीतरी पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करणे गरजेचे होते. सत्ता स्थापनेमागे कदाचित हेच कारण असावे.- किशोर जोरगेवार, अपक्ष आमदार, चंद्रपूर.महाराष्ट्रातील आजचे सत्तांतर अनपेक्षित आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आहे. भाजपने जे सरकार बसविले ते विधानसभेत कदापि बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना व राकाँचेच सरकार राज्यात येणार आहे.- सुभाष धोटे, काँग्रेस आमदार, राजुरा.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार