शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:59 IST

Chandrapur : शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बल्लारपूर तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संकटात सापडलेल्या तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त ४ हजार २६५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी शासनामार्फत मदतनिधी मंजूर करण्यात आला. काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. मात्र, मागणी ५० हजारांची असतानाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ८ हजार ५०० रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, शासनाने एका हेक्टरमागे ८ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी आहे.

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम आजघडीला तालुका प्रशासनामार्फत सुरू आहे. आतापर्यंत २ हजार ७०० च्या जवळपास याद्या उपलोड करण्यात आल्या आहेत. तर मदतीची रक्कम दिवाळीच्या दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. इतरांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात बल्लारपूर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान गेल्या ऑगस्टमध्ये ३ हजार ५६७ शेतकरी व सप्टेंबर महिन्यात ६९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पोर्टलवर याद्या अपलोड

मंजूर मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत २ हजार ७००च्या वर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. याद्या अपलोड करणे सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ३५ गावांतील ३ हजार ५६७ शेतकऱ्यांची ३ हजार ६२९.९३ हेक्टर शेती अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली.

या गावांमध्ये नुकसान

सप्टेंबरमध्ये ६९८ शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक नष्ट झाले. यामध्ये धान २०२ हेक्टर, कापूस ३ हजार ८५ हेक्टर, सोयाबीन ११६ हेक्टर व तूर २२५ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले. जास्त नुकसान झालेल्या काटवली, आमडी, किन्ही, दुधोली, चारवट, पळसगाव, दहेली, कोठारी, कवडजई, बामणी, नांदगाव पोडे, हडस्ती, विसापूर या गावांचा समावेश आहे.

"पुरामुळे आमच्या शेतात दोन हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याची नोंद केली. परंतु, एक हेक्टरचे ८ हजार ५०० रुपये खात्यात जमा झाले."- आबाजी देरकर, दहेली, ता. बल्लारपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Rain-hit farmers receive meager compensation, sparking outrage in Ballarpur.

Web Summary : Ballarpur farmers, hit by August-September floods, are angry. They requested ₹50,000 compensation per hectare but received only ₹8,500. While the administration uploads farmer lists, the low payout sparks discontent.
टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेती