शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वही खरेदी करायला गेलेल्या मुलीचा दुकानदाराकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 10:50 IST

सास्ती टाऊनशिपच्या बाजूला रस्त्यावर राधेश्याम किराणा दुकान आहे. या दुकानात वही घेण्यासाठी आलेल्या एका बारा वर्षीय मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला.

ठळक मुद्देसास्ती टाऊनशिप येथील किराणा दुकानदाराला अटक

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील रामपूर-सहकारनगर येथील येथील एका किराणा दुकानदाराने दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी आरोपी किराणा दुकान व्यावसायिकाविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

राधेश्याम यादव (५०) असे आरोपीचे नाव आहे. सास्ती टाऊनशिपच्या बाजूला रस्त्यावर राधेश्याम किराणा दुकान आहे. या दुकानात शेजारच्या रामपूर, सहकारनगर येथील नागरिक किराणा व अन्य आवश्यक वस्तू घेण्यास येत असतात. सोमवारी सकाळी ९ वाजता एक अल्पवयीन मुलगी वही आणण्यासाठी दुकानात आली होती.

राधेश्याम याने मुलीला वही पाहण्यासाठी दुकानाच्या आत बोलावून तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडून तिला कवटाळले. यामुळे मुलगी घाबरून रडायला लागली. तेव्हा त्याने तिला चॉकलेट देऊन सोडले. या मुलीने घरी रडत येऊन आपल्या आईला घटनेची माहिती दिली.

या घटनेची तक्रार मुलीच्या आईने राजुरा पोलीस ठाण्यात केली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंग कलम ३५४ ए (१) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून सुरक्षा संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, यामुळे या भागात या दुकानदाराविरुद्ध मोठा रोष निर्माण झाला. दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग