शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तीन वर्षीय बालकाचा दारुच्या नशेत बापाने आवळला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:14 IST

पत्नी माहेरी गेल्याचा संताप अनावर : चाकूने वार करीत स्वत:लाही संपविण्याचा प्रयत्न

मूल (चंद्रपूर) : दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्याने पत्नी घरून निघून गेली. याचा संताप अनावर झाल्याने पतीने आपल्या तीन वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:वरही चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मूल तालुक्यातील राजोली येथे रविवारी पहाटे ५ वाजता दरम्यान घडली.

प्रियांशू असे मृत बालकाचे नाव असून गणेश विठ्ठल चौधरी(३१) असे आरोपी पित्याचे नाव आहे. सध्या मूल पोलिसांनी गणेशला अटक करून मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. मूल तालुक्यातील राजोली येथे गणेश विठ्ठल चौधरी हा पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारू पिऊन पत्नीला मारहाण करू लागला. यामुळे ती घरून निघून गेली होती.

घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशू होते. दरम्यान रविवारी पहाटे ५ वाजता दरम्यान दारूच्या नशेत मुलगा प्रियांशू याचा गळा आवळून खून केला व स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. याबाबत मूल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक सुमित परतेकी हे आपल्या पोलिस ताफ्यासह राजोली येथे पोहोचून कारवाई सुरू केली आहे.

आरोपी गणेश विठ्ठल चौधरी हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करून मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोपी पित्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखला करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुमित परतेकी व चमू करीत आहेत.

...तर उडाला असता जनक्षोभ

निर्दयी बापाने आपल्या पोटच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची वार्ता राजोलीत पसरताच नागरिकांमध्ये असंतोष पसरला. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने ते घटनास्थळी दाखल झाले आणि जनक्षोभ उडण्यापूर्वीच आरोपीला ताब्यात घेतले. तो जखमी असल्याने पोलिसांनी त्याला लगेच मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर