शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळी देत आहे हजारो निराश्रितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:36 IST

राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असणाºया नागरिकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा शिव भोजन योजनेने उपलब्ध केली.

ठळक मुद्देदररोज १ हजार ३०० पॅकेट्स वाटप : लॉकडाउनच्या काळात थाळी ठरली संजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुभार्वाच्या काळात निराश्रीत निराधार बेघर व विमनस्क अवस्थेत असणाऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर तालुकास्थळी १ हजार ३०० थाळी दररोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांतही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असणाºया नागरिकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा शिव भोजन योजनेने उपलब्ध केली. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. शिव भोजन थाळीची किंमत १० रूपयांवरून आता केवळ ५ रूपये केली आहे. यामुळे अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.सर्व तालुक्यात केंद्र सुरू होणारजिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे संचारबंदीच्या काळात ही उपाययोजना चंद्र्रपूर शहरासह वरोरा, राजुरा,बल्लारपूर या तीन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये सुरू आहे. शिवभोजन थाळीचे स्वरूप संचारबंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे.अडचणीतच खरी गरजशिवभोजन थाळीचे वितरण करताना छायाचित्र काढले जाते. यामुळे गरजू, गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र अ‍ॅपवरही दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची खरी उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात सिद्ध होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshiv bhojnalayaशिवभोजनालय