शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी सात महिला सदस्यांनी नाकारले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत  सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला. मात्र सरपंचपदाचे आरक्षण हे महिलांसाठी निघाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. 

ठळक मुद्देहिवरे बाजार पॅटर्न : चु‌नाळा गावकऱ्यांनी ठेवला समाजासमोर नवा आदर्श, ग्रामपंचायतच्या राजकारणातील पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती  : चुनाळा येथे शुक्रवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक आगळीवेगळी ठरली. सरपंचपद महिलांकरिता आरक्षित होते. मात्र गावकऱ्यांना या पदावर पुन्हा माजी सरपंच बाळनाथ वडस्कर यांनाच बसवायचे होते. नवनिर्वाचित महिला सदस्यांनाही हेच अपेक्षित होते. एकूण १३ पैकी सात महिला सदस्य दावेदार असताना एकीनेही सरपंच पदाकरिता नामांकन सादर केले नाही. बाळनाथ वडस्कर यांनी उपसरंपदासाठी नामांकन दाखल केले आणि ते अविरोध निवडून आले. सरपंचपद रिक्त राहिले. यामुळे आपोआपच सरपंच पदाचाही कारभार वडस्कर यांच्याकडेच असणार आहे. पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारचा पॅटर्न राबवून चुनाळा वासीयांनी चंद्रपूर जिल्ह्यात नवा आदर्श ठेवला.राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत  सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला. मात्र सरपंचपदाचे आरक्षण हे महिलांसाठी निघाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. सुमारे पाचशे महिला-पुरुषांनी तहसीलवर धडक देत सरपंच पदाचे आरक्षण बदलवून देण्याची मागणी केली.  परंतु प्रशासनाने हे शक्य नसल्याचे सांगितले.  अखेर गावकऱ्यांनी हिवरे बाजार पॅटर्न अमलात आणण्याचा निर्णय घेतला. सरपंचपद आरक्षित असताना एकाही महिला सदस्याने आपले नामांकन दाखल केले नाही. उपसरपंचपदाकरिता माजी सरपंच असलेले नवनिर्वाचित सदस्य बाळनाथ वडस्कर यांनी एकमेव नामांकन दाखल केले आणि ते अविरोध निवडून आले. सरपंचपद रिक्त राहिले. परिणामी गावकऱ्यांच्या इच्छेनुसार सरपंचपदाचा प्रभार उपसरपंच या नात्याने बाळनाथ वडस्कर यांच्याकडेच असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांनी काम पाहिले. 

महिला सदस्यांनी का नाकारले सरपंचपदग्रामपंचायतीच्या मालकीचे विश्रामगृह चुनाळा येथे आहे. सात एकर परिसरात साग वृक्ष असून कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ग्रामपंचायतीचे पहिले सचिवालय उभारले. गावातील सर्व कार्यालये, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, बँक, ग्रामपंचायत याच इमारतीत आहे. स्वतंत्र सभागृह असून  सामाजिक कार्यक्रम व खासगी कार्यक्रम करण्यास सोईचे आहे. मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्यांची सुविधा आहे. या विकास कामांवर विश्वास ठेवून बाळनाथ वडस्कर यांनाच सरपंचपदी विराजमान करण्याचा निर्णय जनतेने घेतला. या निर्णयाची ग्रामपंचायत सदस्य संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमणकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर, दिनकर कोडापे, राजू किनेकर, राकेश कार्लेकर, रवी गायकवाड, सचिन कांबळे यांनी कृतीतून अंमलबजावणी केली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच