शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:40 IST

विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अपयशी

प्रवीण खिरटकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर: विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण गाठून रेशीम संचालनालय कार्यालयात गेल्यावरच शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तयारी असूनही शेतकरी रेशीम शेतीबाबत उदासीनता बाळगून आहे.शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या पारंपारिक शेतीसोबतच शेतीमध्ये जोडधंदे करावे. यासोबतच रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. रेशीम शेतीकरिता विदर्भातील वातावरण योग्य असल्याचे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. रेशीमला वस्त्रउद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यांना भावही अधिक मिळण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भात रेशीम शेती नगण्य असल्याचे दिसून येते. रेशीम शेती करण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तालुकास्तरावर शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी रेशीम शेतीच्या माहितीपासून अनभिज्ञ राहत आहेत. प्रारंभी कुठलेही पीक नव्याने शेतात घेत असताना शेतकऱ्यांना वारंवार मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असल्याने आपल्याला वेळोवेळी रेशीम शेती करताना मार्गदर्शन मिळेल काय, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.तालुका स्तरावर कार्यालय नाही. रेशीम संचालन कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. रेशीम शेती सदर कार्यालयाशी संलग्न आहे. अशा प्रकारचे कार्यालय तालुका स्तरावर शासनाने सुरू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतो.तालुका कृषी विभागाकडून प्रस्तावरेशीम शेती करावयाची असल्यास प्रस्ताव जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालयाकडे द्यावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत असल्याने तालुका कृषी विभागाकडे रेशीम शेतीचा प्रस्ताव दिल्यास तो रेशीम संचालनयाकडे कृषी विभागाने पाठविणे सुरू केले आहे.कृषी विभागास रेशीम संचालनालय जोडावेबहुतांश शेतीविषयी योजना तालुका कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर रेशीम संचालनालय हे कृषी कार्यालयाशी जोडल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी उपलब्धी होईल व तालुका स्तरावरील कृषी कार्यालयात जावून वेळोवेळी मार्गदर्शन घेणे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती