चंद्रपूर : लक्ष्मीनगर परिसरातील लक्ष्मी अपार्टमेंटसमोर २३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास कुत्र्यांनी भटकलेल्या एका बकरी पिलाला पकडून फरफटत ओढत नेत होते. त्यावेळी परमजित कौर आणि तनवी पथाडे यांनी हिंसक बनलेल्या कुत्र्यांच्या तावडीतूनत्या पिलाला वाचविले.ते जखमी पिलू दुसरीकडे धावत गेले असता पुन्हा त्या कुत्र्यांनी पिलाला ओढत नेले. त्यामुळे धावत जाऊन त्या मुलींनी कुत्र्यांवर दगडाचा मारा केला. त्याद्वारे त्यांनी कुत्र्यांना पिटावून लावले. त्याला पिलाला बेवारस हिंसक कुत्र्यापासून वाचविले. त्यांनी जखमी पिलाला उचलून घरी आणून त्यावर प्रथमोपचार केला. बकरी कळपाच्या राखणदाराला ही बाब सायंकाळी कळताच पिलाला त्याच्या स्वाधीन करण्यात आले. परमजित कौर ही मॅकृन हायस्कूलची इयत्ता दहावीची तर तनवी पथाडे नारायणी विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. त्यांच्या धाडसाचे या परिसरात कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
शाळकरी मुलींनी वाचविले बकरी पिलाचे प्राण
By admin | Updated: February 26, 2017 00:48 IST