शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६ लाखांचा घोटाळा; पर्यवेक्षकासह चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:09 IST

बाजार समितीमधील प्रकरण : सचिवाची अखेर पोलिस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण योजनेत शेतमाल न ठेवता बनावट कागदपत्र तयार करून ४६ लाख ५८ हजार ५० रुपये तीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी बाजार समितीने अखेर पोलिसात तक्रार केली. त्यावरून वरोरा पोलिसांनी गुरुवारी (दि. ८) निलंबित पर्यवेक्षकासह चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल आहे. निलंबित पर्यवेक्षक कोमल गारघाटे, अनिल तडसे, विजय कळसकर व गुरुदत्त कुळसंगे, अशी आरोपींची नावे आहेत.

वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत तत्कालीन पर्यवेक्षक कोमल गारगाटे यांच्याकडे शेतमाल तारण योजनेची जबाबदारी होती. या योजनेत शेतमाल ठेवल्यास शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम ताबडतोब दिली जाते. पर्यवेक्षक गारघाटे याने २१ एप्रिल २०२२ ते २२ एप्रिल २०२४ या कालावधीत शेतमाल तारण योजनेत ठेवला नाही. 

तारण योजनेतील घोटाळ्याबाबत बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी वरोरा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून निलंबित पर्यवेक्षक गारघाटे, अनिल तडसे, विजय कळसकर व गुरुदत्त कुळसंगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ४०६, ४०९, ४२०, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वळतीबनावट कागदपत्र तयार करून वरोरा येथील अनिल मधुकर तडसे यांच्या बँक खात्यावर ३१ लाख ७७ हजार २५८, परसोडाचे विजय पुंजाराम कळसकर यांच्या बँक खात्यात १९ लाख ८५ हजार ३७२ आणि गुरुदत्त कुळसंगे यांच्या खात्यात चार लाख ९५ हजार ३४, असे एकूण ४६ लाख ५८ हजार ५० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बँक खात्यातून वळते. परंतु, तारण योजनेत सोयाबीन ठेवल्याची नोंदच दिसून आली नाही. त्यामुळे पर्यवेक्षक कोमल गारघाटे याला निलंबित करण्यात आले.

यापूर्वी राज्यभरात गाजला होता कांदा घोटाळाचंद्रपूर जिल्ह्यात कांदा हे पीक अतिशय नगण्य प्रमाणात घेतले जाते. मात्र, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या ६७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे २ कोटी ३० लाख रुपये अनुदान जमा झाल्याचे प्रकरण यापूर्वी राज्यभरात गाजले होते. वरोरा तालुक्यात कांद्याचे पीक कृषी विभागाच्या मते, ७५ हेक्टरवर होते. परंतु, बाजार समितीत ६५ हजार क्विंटल कांदा कसा काय विकला गेला, असा प्रश्न त्यावेळी नागरिकांनी विचारला होता.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर