२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता ग्रामस्वच्छता, सकाळी ८ वा. रांगोळी, सकाळी १० वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिला सबलीकरण या विषयावर भूमिपुत्र ब्रिगेडच्या संघटिका शाहिदा शेख या मार्गदर्शन करणार आहे. दुपारी २ वा. लहान मुले, मुली व महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आसावरी देवतळे, स्त्रीरोग तज्ज्ञ मनिषा रेवतकर, बालरोज तज्ज्ञ डॉ. देवेंद्र लाडे आरोग्य तपासणी करणार आहे. सायंकाळी ७ वा. मद्यपाश एक जीवघेणा घातक आजार या विषयावर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ६ वा. ग्रामस्वच्छता, दुपारी गीतगायन, सायंकाळी ६ वा. क्रांतिज्योती सावित्रीमाई जयंती समारोह आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नितेश बाळकृष्ण कराळे उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ६ वा. ग्रामस्वच्छता सकाळी १० वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
सावलीत सावित्रीमाई फुले जयंती उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST