शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बचत गटांची अडीच लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:14 IST

शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनामध्ये घालवावा.

ठळक मुद्देविविध विभागाचे मॉडेल : कृषी प्रदर्शनाला भेट देऊन रविवार साजरा करा -जिल्हा प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनामध्ये घालवावा. याठिकाणी बचत गटांच्या वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन ग्रामीण भागातील महिला बचत गट व शेतकऱ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या सरस विक्री प्रदर्शनामध्ये पहिल्याच दिवशी दोन लाख ५३ हजार एवढी भरघोस विक्री झाली आहे. त्यात नागभीड तालुक्यातील झेप प्रभाग संघाने उत्पादित केलेल्या विविध वस्तू, मोठ्या प्रमाणात विक्री झाल्या आहेत.ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूह आणि उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, बचत गटांच्या महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित वस्तूंची भव्य विक्री प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित केले आहे. या विक्री प्रदर्शनीमध्ये स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या सुगंधित अगरबत्ती, घोंगडी व गाद्या कापडी बॅग, लोकर विणकाम, विविध प्रकारच्या मातीच्या शोभेच्या वस्तू व भांडी, लाकडी शोभेच्या वस्तू, बांबू हस्तकला विविध प्रकारचे लोणचे, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित वस्तू, झुणका-भाकर ते विविध शाकाहारी,मांसाहारी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. विविध नाश्त्याचे प्रकार सेंद्रीय शेतीतील आवश्यक असलेले सेंद्रिय खत, बीजामृत, जीवामृत, द्राक्षासव पशुपालनासाठी आवश्यक असणाºया बाबींसह या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या पशुंचे देखील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये पोंभूर्णा तालुक्यातील महालक्ष्मी समूहाने मच्छी पासून तयार केलेले लोणचे, चकली पापड, चिमूर तालुक्यातील शारदा स्वयंसहाय्यता समूहाने सौंदर्यप्रसाधने तयार केली आहेत. त्यांचीही भरपूर विक्री होत आहे. तसेच फुड स्टॉलवरील अनेक स्टॉलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा डॉ.उदय पाटील यांनी संयुक्तरित्या जारी केलेल्या पत्रकामधून केले आहे.