शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

"वाचवा वाचवा ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा", इको-प्रोचे आंदोलन

By साईनाथ कुचनकार | Updated: December 7, 2023 17:01 IST

हे आंदोलन इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.

चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने हिवाळी अधिवेशनानिमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘एक दिवस एक आंदोलन’ या आंदोलनाच्या साखळीची सुरूवात केली. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी इको-प्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावर निदर्शने करत एसटीपी बांधकामाला तातडीने सुरूवात करण्याची मागणी केली आहे. हे आंदोलन इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.

रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असून, शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. मात्र, या तलावात मच्छी नाला आणि जलनगरमधून येणारे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. तलावात वाढणारी इकॉर्निया, भूजलाचे प्रदूषण, तलावाच्या लगतचे जलस्रोत प्रदूषित होत आहेत. तलावाच्या घाण पाण्याची दुर्गंधी यासारख्या समस्या निर्माण होत आहेत.

रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी यापूर्वी इको-प्रोने सत्याग्रह-आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केवळ खोलीकरण केले. मात्र, सांडपाणीमुक्त करण्यास ‘एसटीपी’ बांधकाम प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. यासंदर्भात राज्य शासनासह प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘‘एसटीपी’चे बांधकाम, रिटेनिंग वॉलचे बांधकाम त्वरित पूर्ण करा’, ‘वाचवा वाचवा ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा’, ‘मुक्त करा मुक्त करा रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.

या आंदोलनात इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, रवी गुरनुले, कुणाल देवगिरकर, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, प्रमोद देवांगण, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कंडवार, प्रकाश निर्वाण, अतुल इंगोले, संदीप इंगोले, सुबोध संगमवार, शुभम खोब्रागडे, विशाल किन्नाके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चंद्रपूरसह राज्यातील अन्य अनेक शहरांतील तलावांची दुरवस्था झाली आहे. सर्व तलाव प्रदूषणमुक्त, सांडपाणीमुक्त करत त्यांचे पर्यावरणीयदृष्टया महत्त्व जाणून संवर्धन करणे आवश्यक आहे. ‘महाराष्ट्र शहरी तलाव सांडपाणी-प्रदूषणमुक्त योजना’ राबविणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे. राज्यातील शहरा-शहरांतील तलावांच्या स्वरूपातील नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा नष्ट होण्यापासून वाचविणे आवश्यक आहे.- बंडू धोतरेअध्यक्ष, इको-प्रो चंद्रपूर

टॅग्स :agitationआंदोलन