शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवनातील स्वरानंदवन आॅर्केस्ट्राची बस उभ्या टिप्परवर धडकलीे; डॉ. विकास आमटे यांचे सहकारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 09:38 IST

मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन येथील स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलावंतांना घेऊन येणाऱ्या बसची उभ्या टिप्परला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देएक ठार, तीन जखमी ४१ कलावंतही किरकोळ जखमी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन येथील स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलावंतांना घेऊन येणाऱ्या बसची उभ्या टिप्परला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. सोबतच बसमधील ४१ कलावंत किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.पुरुषोत्तम नांदेकर (४८), मेघराज भोयर (३७) व अक्षय राऊत अशी गंभीर जखमींची नावे आहेत. मूर्तीजापूर येथे प्रशांत चहाणकर यांनी आनंदवनातील स्वरानंदवन आर्केस्ट्राचे आयोजन केले होते. आनंदवनातील सर्व कलावंत कार्यक्रम आटोपून परत आनंदवनाकडे निघाले. जाम येथे चहा घेऊन कलावंतांची बस (क्रमांक एमएच ३४ ए ८२३८) आनंदवनकडे जात असताना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील रामपूर गावाजवळ उभ्या असलेल्या टिप्परला (क्रमांक सीजी ०७ ई ८८१४) बसची धडक बसली. यात बाळू माटेसह बसमधील कलावंत जखमी झाले. बाळू माटे यांना उपचारार्थ दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम नांदेकर, अक्षय राऊत व मेघराज भोयर यांच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे. अन्य कलावंत किरकोळ जखमी आहेत.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून आनंदवनाला पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात