शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

संततधार : जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 22, 2015 01:15 IST

पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर शेतकरी एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पूर्ण झाली आहे.

अनेकांच्या घरात पाणी : चंद्रपूर तालुक्यात पावसाची सर्वाधिक २०० मिमी नोंद चंद्रपूर : पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर शेतकरी एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. मात्र अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक पाऊस पडल्याने अनेकांचे नुकसान झाले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. या संततधार पावसामुळे चंद्रपुरातील अनेक रस्त्यावर पाणी साचून त्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. पठाणपुरा गेटजवळील झरपट नाल्याला आलेल्या पुरात १९ वर्षीय युवक वाहून गेला. सखल भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले. चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २०० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे जनजीवनच विस्कळीत झाले.पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. पावसाने जराही उसंत न घेतल्याने गावागावातील व्यवहार ठप्प पडले. चंद्रपूरसह कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यात काल्ां शनिवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. प्रारंभी रिमझिम पाऊस बरसला. मात्र त्यानंतर पावसाचा वेग वाढू लागला. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. रविवारी सकाळीदेखील पावसाचे कोसळणे सुरूच होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास १५ ते २० मिनिटे पावसाने उसंत घेतली असावी. त्यानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. या संततधार पावसामुळे चंद्रपुरातील हिंदी सिटी हायस्कूलजवळ तीन ते चार फूट पाणी होते. पोलीस प्रशासनाने हा मार्गच रहदारीसाठी बंद केला होता. याशिवाय कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, जयंत टॉकीज, सीटी हायस्कूल, श्री टॉकीज, गंजवॉर्ड, गोलबाजार, बिनबा रोड, तुकूम परिसरातील वाहतूक कार्यालय, ऊर्जानगर मार्ग हे रस्ते जलमय झाले होते. भद्रावती तालुक्यातील कचराळा गावाजवळ बांधण्यात येत असलेला पुल वाहून गेल्याने तालुक्यातील कचराळा या गावाचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घुग्घुस येथील कॉलरी तलावाचा ओव्हरफ्लोचा मार्ग खुला न केल्याने तलाव परिसरातील २०-२५ घरात पाणी शिरले.सोबतच वेकोलिचे कोळसा उत्पादनही प्रभावित झाले. (शहर प्रतिनिधी)ब्रह्मपुरी-वडसा राज्य मार्गावरील वाहतूक खोळंबलीब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीवरुन वडसा येथे जाणाऱ्या राज्यमार्गावर सुरबोडी गावालगत एका नवीन काम केलेल्या वळणावर चिखलाचे खड्डे निर्माण झाल्याने एक ट्रक फसला आणि त्यामुळे काल रात्रोपासून वडसा मार्ग पूर्णत: बंद झाला आहे. वाहतूक अन्य मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. ब्रह्मपुरी-वडसा हा दहा किमीचा राज्यमार्ग आहे. या मार्गावर सुरबोडी गावाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूने एक वळण तयार करण्यात आले आहे. परंतु वळण रस्ता हा मजबूत केला नाही. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले व खड्डा मोठा होऊन एक मालवाहू ट्रक फसला. हा ट्रक फसल्याने वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक खोळंबली आहे. मनपाची नाले सफाई गेली कुठे ?पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करून चंद्रपुरातील मोठे नाले सफाई मोहीम सुरू केली. जेसीबीने गाळ काढताना छायाचित्र टिपून ते प्रसारमाध्यमांकडे पाठवित स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. मात्र ही नाले सफाई केवळ फार्स असल्याचे मंगळवारी व शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे स्पष्ट झाले. या नाल्यांमुळे बॅक वाटर अनेक रस्त्यावर साचून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. सुटी आणि पावसाचा आनंदशनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी या पावसाचा आनंद लुटला. तरुणांनी तर छत्री, रेनकोट न घेताच पावसात मनमुराद फिरणे पसंत केल्याचे दिसून आले. अनेकजण पावसात मनसोक्त भिजत होते. घरावर वीज कोसळलीब्रह्मपुरी : देलनवाडी वॉर्डातील शांतीनगरात डॉ.गणवीर यांच्या दवाखान्याजवळ राहत असलेले भाविक सुखदेवे यांच्या घरावर वीज पडली. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. परंतु घरावर लावलेले नावाचे अक्षर, टॉवरची भिंत व मीटरचे कव्हर, घरातील लाईटचे बोर्ड, कॉलबेल या वस्तू तुटून पडल्या. त्यांचे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना दिलासाअनेक शेतकरी एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. गावातील तलाव, बोडी, छोटे तलाव यात पाणी साचल्यामुळे आता पेरणीच्या कामांनाही वेग येणार आहे.