सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटीतून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:33 PM2018-01-22T23:33:29+5:302018-01-22T23:34:00+5:30

सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटी करप्रणालीतून वगळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांला दिलेल्या निवेदनातून केले आहे.

Sanitary napkins leave GST | सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटीतून वगळा

सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटीतून वगळा

Next
ठळक मुद्देमहिला काँग्रेस कमिटी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटी करप्रणालीतून वगळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांला दिलेल्या निवेदनातून केले आहे.
भाजपा सरकारने काही महिन्यांपूर्वी जीएसटी करप्राणाली लागू केली. त्यामध्ये महिलांच्या सॅनिटरी नॅपकीन्सवर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इतर देशात सॅनिटरी नॅपकीनवर अत्यंत कमी कर लावण्यात येते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन्सला जीएसटीतून वगळण्याची मागणी महिला काँग्रेसने यापूर्वी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र रविवारच्या कर बदलच्या निर्णयामध्ये सॅनिटरी नॅपकीन्सबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सॅनिटरी नॅपकीन्सच्या वापरावर भर देण्यात येत आहे. मात्र त्यावर अतिरिक्त कर लादून महिलांच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमधून वगळावे, कर्करोग रुग्णांना सॅनिटरी नॅपकीन्स व आरोग्य सेवा मोफत द्यावी, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन्स वेंडिग व डिस्पोजेबल मशिन लावावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुताई टोकस यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाºयामार्फंत मुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस नंदा अल्लूरवार, सल्लागार रजनी हजारे, ज्योती राखुंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, मिनाक्षी पेटकर, हर्षा चांदेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Sanitary napkins leave GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.