शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशामुळे जीवनदायिणी वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला ...

ठळक मुद्देबंद असतानाही रोजरोसपणे नदीपात्रातून वाळूचा उपसा

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला असला तरी त्या प्रमाणात कितीतरी पटीने रेती चोरी झाली. घुग्घुसजवळील वर्धा नदीच्या नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव, चिंचोली घाटावरून सातत्याने रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होत आहे. नदीपात्रातच खोल खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणच्या नदीचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. घुग्घुस परिसरातून वर्धा नदी वाहते. त्यात नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव व अन्य घाट आहेत.  गेल्या दोन वर्षांपासून शासनाने या घाटांचा नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याच घाटांचा लिलाव केला नाही. तरीही घुग्घुस परिसरातील घाटावरून मोठया प्रमाणावर दिवसरात्र रेतीचा उपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. लोडर, जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे. यामुळे वर्धा नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. पात्र रुंद आणि खोल झाले आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले आहेत. यामुळे नदीचे अस्तित्वही धोक्यात आहे.

शेकडो ब्रास रेतीचा उपसा वर्धा नदीवरील नकोडा, घुग्घुस, घोडाघाट, नायगाव, चिंचोली असे विविध घाट आहेत. या घाटांवरून पे लोडर, जेसीबींच्या सहाय्याने रेतीचे दररोज उत्खनन केले जात आहे. मोठ मोठ्या हायवा ट्रक, ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक केली जात आहे. या घाटांवरून दररोज शेकडो ब्रास रेतीचा उपसा होत आहे. यातून अनेक रेती तस्कर गब्बर बनले आहेत. तरीही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची   असणार नजर पोलीस ठाणे, पटवारी व मंडळ आधिकाºयांच्या कार्यालयासमोरूनच रात्रंदिवस दररोज रेती तस्करी होत आहे. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे. आता दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याची लिंक थेट तहसीलदार यांच्या भ्रमणसेवेला जोडण्यात आली आहे. 

नदीपात्रातील रेतीचा अवैधपणे उपसा केल्यानंतर निशि्चतच नदीचे नैसर्गिक पात्र बदलते. ज्या भागातून रेतीचा उपसा केला जातो, त्या भागात पावसाळ्यात पाणी शिरते. त्यामुळे पुराचा धोका असतो. याशिवाय रेतीचा वारंवार उपसा केल्याने जलजन्य वनस्पती व किटके आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवर परिणाम होत आहे.- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :sandवाळूriverनदी