शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्कर दंडच भरेनात, लिलावातून करणार वसुली; महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर

By साईनाथ कुचनकार | Updated: February 25, 2024 20:40 IST

... यातून चंद्रपूर तालुका प्रशासन २ कोटी १ लाख १ हजार ६५२ रुपयांचा महसूल वसूल करणार आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. त्यातच शासकीय डेपोसुद्धा सुरू झाले नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे. या तस्करीतील अनेक वाहने चंद्रपूर तहसील प्रशासनाने जप्त केली आहेत. मात्र संबंधित वाहनांचे मालक दंडाची रक्कम भरत नसल्याने आता कठोर पाऊल उचलत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. यातून चंद्रपूर तालुका प्रशासन २ कोटी १ लाख १ हजार ६५२ रुपयांचा महसूल वसूल करणार आहे.

चंद्रपूर तालुका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये रेती तस्करीप्रकरणी अनेक वाहने जप्त केली आहेत. यातील काही वाहन मालकांनी दंड भरून आपले वाहन प्रशासनाकडून सोडवून नेले. मात्र अजूनही ९८ वाहन मालकांनी दंड भरलाच नसल्याने त्यांचे वाहन जप्त करून ठेवण्यात आले आहे. मात्र आता वाहन जप्त केल्याची मुदत संपत असल्याने तहसील प्रशासनाने या वाहनांचा लिलाव करून महसूल वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित वाहन चालकांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता या जप्त वाहनातून २ कोटी १ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात येणार आहे.

जप्त केलेल्या वाहनांची संख्याट्रॅक्टर ५८

हायवा १४हापटन ११

तीनचाकी ऑटो ५ट्रक ४

जेसीबी १

तस्करही लई भारीरेती तस्करीसाठी अनेकवेळा जुन्या वाहनांचा वापर केला जातो. विशेषत: नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचा या तस्करीसाठी अनेकवेळा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्यावेळी प्रशासनाने वाहन जप्त केले तरी वाहन मालकांचे फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे अनेकवेळा जप्त केलेले वाहन सोडविण्याच्या भानगडीत वाहन मालक पडत नाही. तर काहीवेळा प्रशासनाला न घाबरताही मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जाते.रेती तस्करीप्रकरणी चंद्रपूर तालुका प्रशासनाने अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. मात्र संबंधित वाहन मालक दंड भरत नसल्याने हा दंड वसूल करण्यासाठी आता जप्त वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. यासंदर्भात संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

-विजय पवार, तहसीलदार, चंद्रपूर 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया