शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

हताश शेतकऱ्यांच्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणजे बैल. शेतकरी वर्षभर बैलाला जिवापाड जपतो. कसदार मातीतून सोनं पिकविण्यासाठी बैलाचे मोठे योगदान असते. परंतु, यावर्षी बोंडअळी व विविध रोगांनी पिकांना ग्रासल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी वर्षभर जीवापाड जपलेल्या ढवळ्या-पवळ्याची कवडीमोल भावात विक्री करीत आहे. ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : बैलबाजारावर मंदीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणजे बैल. शेतकरी वर्षभर बैलाला जिवापाड जपतो. कसदार मातीतून सोनं पिकविण्यासाठी बैलाचे मोठे योगदान असते. परंतु, यावर्षी बोंडअळी व विविध रोगांनी पिकांना ग्रासल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी वर्षभर जीवापाड जपलेल्या ढवळ्या-पवळ्याची कवडीमोल भावात विक्री करीत आहे. बैलबाजारावर सध्या मंदीचे सावट असून याचा फायदा दलाल घेत आहेत.जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी पूर्णत: काकुळतीला आला आहे. शेतात वर्षभर राबूनही शेवटी हाती काहीच लागले नाही. हा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर ओढविलेली परिस्थिती अतिशय भयावह आहे. शेतकऱ्यांना यावर्षी पूर्णत: बोंडअळीने हैराण करून सोडल. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आणि बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला आहे.शेतकºयांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असताना दरवर्षी शेतीला येणारा तोटा शेतकऱ्यांनी कुठपर्यंत सहन करायचा म्हणून नाईलाजाने शेती करण्यालाच नकार देत आहे. अशातच पाळीव जनावरांचा खर्च पेलत नसल्याने व त्याच्या चाऱ्याचा प्रश्न असल्याने वर्षानुवर्षे जीवापाड जपलेल्या बैलांची कवडीमोल दरात विक्री केली जात आहे. त्याचा पुरेपूर फायदा खासगी दलाल घेत असून अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांकडून बैलाची खरेदी करण्यात येत आहे.बैलजोडीच्या किंमती एक लाख रुपयापर्यंत गेल्या आहेत. परंतु, खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांनी बैलांच्या किमती कमी करून शेतकºयांकडून मिळेल त्या पडत्या भावात बैलांची खरेदी करणे सुरू केले आहे.परप्रांतात बैलाची विक्रीशेतकºयांकडून कमी दरात बैलजोडी खरेदी करून परप्रांतात त्या बैलाला विकणारी टोळी या भागात सक्रिय झाली आहे. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून बैलांची अर्धी किंमतही दिली जात नसल्याचे दिसून येते.