२८ ला जेबीसीसीआयची बैठक : ३.५ लाख कामगारांना प्रतीक्षाचंद्रपूर : कोल इंडिया लिमिटेडच्या ३ लाख ४५ हजार कामगारांचे वेनतवाढीकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात २८ फेब्रुवारी व १ मार्चच्या संपूर्ण जेबीसीसीआयच्या वेतन पुन:निर्धारणाबाबत बैठक होत आहे. त्यामध्ये कोळसा कामगारांच्या वेतन आयोगाचाही फैसला होणार आहे.यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये केवळ चर्चा झाली. आधीच्या नवव्या वेतन आयोगाच्या वेळी बी.एम.एन. चर्चेमध्ये सहभागी नव्हती. आता न्यायालयीन आदेशानुसार इंटक बाहेर आली आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये सी.आय.एल.चे अधिकारी वेतन आयोगाबाबत टाळाटाळ करीत असत. परंतु आता कोल इंडिया लिमिटेडला कमीत कमी नवव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर १० वा वेतन लागू करावा लागेल. यावर एप्रिल महिन्यामध्ये सुधारित विधेयक सादर करण्यात येणार आहे. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रॅज्युटी कायद्याचे सुधारित विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यामुळे कोळसा कामगाराचे लक्ष २८ फेब्रुवारी १ मार्चच्या जेबीसीसीआयच्या बैठकीकडे लागले आहे. आज कोळसा कामगार प्रकृतीच्या विरूद्ध हजारोतील आत व खुल्या कोळसा मधुन अहोरात्र कोळसा उत्पादन करीत असतो. त्याना त्यांच्या श्रमाचे मोल मिळालाच पाहिजे (प्रतिनिधी)ग्रॅच्युइटीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाकोल इंडिया लिमिटेडचे अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात २३ फेबु्रवारी रोजी ग्रॅच्युइटी बाबत बैठक झाली. त्यामध्ये केंद्रीय कामगार मंत्रीदेखली सहभागी झाले होते. त्यावेळी २० लाख ग्रॅच्युइटीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर सहमती झाली तर देशभरातील ३२० सार्वजनिक उद्योगामध्ये कार्यरत कामगारांना त्याचा लाभ मिळणार आहे. या बैठकीत कामगार मंत्र्यांनी सिलिंगबाबत स्पष्ट भूमिका मांडली नाही. तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिलिंगला विरोध केला आहे. हा कायदा १ जानेवारी २०१६ रोजीपासून लागू करण्यास सहमती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोळसा कामगारांचे वेतन पुनर्निधारण होणार
By admin | Updated: February 27, 2017 00:43 IST