शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

समृद्ध गाव विकासासाठी ‘साद माणुसकीची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:42 IST

एक वर्षापूर्वी कोठारी केंद्रातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना २० लाख रुपयांचे संगणक संच पुरविण्यात आले. प्रत्येक शाळेतील शौचालय दुरुस्ती करून स्वच्छ करण्यात आले.

ठळक मुद्देकोठारीत तीन दिवस विविध कार्यक्रम : विद्यार्थी, नागरिकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : एक वर्षापूर्वी कोठारी केंद्रातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना २० लाख रुपयांचे संगणक संच पुरविण्यात आले. प्रत्येक शाळेतील शौचालय दुरुस्ती करून स्वच्छ करण्यात आले. केंद्रातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात तज्ज्ञांकडून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. खेड्यात जन्मलेल्या आणि शिक्षण घेवून वैभव संपन्न झालेल्यांना एकत्रित करुन त्यांचा आर्थिक हातभार गावाच्या विकासासाठी लागावा यासाठी साद माणुसकीद्वारे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा पहिला प्रयोग कोठारीत करण्यात आल्याचे प्रतिपादन साद माणुसकीची फाऊंडेशनचे हरिश बुटले यांनी केले.कोठारी पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी कोठारी येथे सतत तीन दिवस ‘साद माणुसकीचा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागातील आरोग्याची समस्या लक्षात घेता बालक, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक शाळा कोठारी येथे पार पडले. या शिबिरात पुणे येथील डॉ. रोहिणी बुटले, डॉ. अनिल पटले, डॉ. प्रिती चौहान, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. विनोद सवाईतुल, डॉ. बलवंत कोवे, डॉ. प्रकाश नगराळे, डॉ. नितीन पेंदे व डॉ. नितीन गायकवाड यांनी जवळपास ३०० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला.युवकांना शिक्षण घेण्यात गोडी निर्माण व्हावी व नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक कौशल्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी फुले-आंबेडकर सभागृहात युवा संवाद व कौशल्य विकास कार्यशाळा पार पडली. यात डॉ. उमेश कणकवलीकर यांनी युवकांशी थेट संवाद साधला. तीन दिवसीय समारोपीय कार्यक्रमाला प्रा. उपलंचीवार, साद माणुसकीची फाऊंडेशनचे हरिश बुटले, डॉ. रोहिणी बुटले, सरपंच मोरेश्वर लोहे, गणिततज्ञ रवी वरे, पं. स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन सतीश बावणे तर आभार अभय बुटले यांनी मानले.विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालयाचे लोकार्पणशहरातील विद्यार्थ्यांना पालकांकडून व शासकीय यंत्रणेकडून अनेक सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेड्यातील युवकांपेक्षा कित्येकपटीने शहरातील विद्यार्थी विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. मात्र त्यात ग्रामीण विद्यार्थी असुविधेपोटी माघारत आहे. स्पर्धा परीक्षेची उपयुक्त माहिती मिळावी यासाठी कोठारीत ईश्वरलाल परमार यांच्या प्रयत्नातून ग्रंथालयासाठी पाच संगणक संच, प्रवीण मसाले सुहाना ग्रुपतर्फे २० खुर्च्या, रूरल रिलेशन पुणेकडून बाल, वाचक व पालकांसाठी २५ हजारांची पुस्तके, दीपस्तंभ फाऊंडेशन जळगावकडून विविध स्पर्धा परीक्षेची २० हजारांची पुस्तके प्राप्त झालीत. त्यामुळे कोठारी येथे डिजिटल राधा-बापू ग्रंथालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.