शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

व्याघ्र रक्षकाचीच प्रकल्पाच्या नियमांना तिलांजली

By admin | Updated: July 28, 2016 01:38 IST

चिमूरला लागून असलेल्या कोलारा गेटवरून देशी-विदेशी पर्यटक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी येत असतात. ..

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाठराखण : शिवसेनेची दोषींवर कारवाई करण्याची मागणी चिमूर : चिमूरला लागून असलेल्या कोलारा गेटवरून देशी-विदेशी पर्यटक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी येत असतात. मंगळवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने कुणालाही व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला जात नाही. मात्र चिमूर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया दौलतराव मालवे यांच्यासाठी शासकीय नियम धाब्यावर ठेवून वाहनासह सात लोकांना प्रवेशबंदीच्या दिवशी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनचे उपसंचालक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. २० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिसंवेदनशिल आहे. या व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी बघण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तीसह देशी-विदेशी पर्यटक कोलारा गेटवरून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करीत असतात. साप्ताहिक सुटी मंगळवारला असते. यावेळी कोलारा गेट बंद असते. याची कल्पना आपणाला नव्हती. मी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी मंगळवार ३१ मे २०१६ ला दुपारी १२ वाजता कोलारा गेटवर पोहचलो. गेटवरील आरएफओशी चर्चा केली असता मंगळवारला कोणालाही व्याघ्र प्रकल्पात प्रवेश नाही, असे सांगितले. मात्र त्याच वेळेस १२.१५ वाजता चिमूर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया दौलतराव मालवे या एमएच ३४ एबी १९७२ बोलेरो पिकअप या क्रमांकाचच्या शासकीय वाहनाने सिव्हिल ड्रेस घालून तिथे आल्या. ड्रायव्हर व इतर व्यक्ती मिळून सात लोकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. या दिवशी पर्यटनास बंदी असताना खासगी व्यक्तीला एसटीपीएफ कर्मचारी दाखवून १+१+५ अशी कोलारा गेटला नोंद केली आहे. मात्र ड्रायव्हर वगळता त्या गाडीत एकही कर्मचारी नव्हता. फारेस्ट अ‍ॅक्टनुसार त्या दिवशी प्रवेशास बंदी असताना एसटीपीएफचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना प्रवेश दिला कसा, असा आरोप डांगे यांनी केला. यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी वन्यप्राण्याच्या शिकारी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच प्रकल्पात वाघासाठी फासे मांडणाऱ्यांना वनविभागाने पकडले होते. व्याघ्र प्रकल्पाचे नियम अधिकाऱ्यांना माहिती असताना इतर व्यक्तींना प्रवेश बंदीच्या दिवशी सोबत घेऊन व्याघ्र प्रकल्पाची भ्रमंती केली, ही बाब संशयास्पद आहे. व्याघ्र प्रकल्पाचे परिभ्रमण करून परतीच्या मार्गाने येत असताना ज्या गेटवरून गेले, त्या गेटवरून न येता कोलारा गेटच्या मागील कुटीतून परतले. याही कोलारा कुटीवरून बाहेर येण्यास सक्त मनाई आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करणाऱ्यांचा कदाचित वाघाची शिकार करण्याचा उद्देश असू शकतो. असा आरोपही पत्रकार परिषदेतून विलास डांगे यांनी केला आहे. या प्रकरणाविषयीची तक्रार प्रथम भ्रमणध्वनीवरून डीएफओ दीपक खाडे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर ४ जुलैला दुसरी तक्रार निवेदनासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोर) क्षेत्र संचालक यांना देण्यात आली. तोंडी सूचना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गरड यांना दिली. तक्रार करून आता २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रकरण थंडबस्त्यात असून दडपण्याचा प्रयत्न क्षेत्र संचालकांकडून होत असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. चिमूर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या प्रिया मालवे यांची पाठराखण करणारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) झोनचे उपसंचालक कडस्कर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया मालवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विलास डांगे यांनी केली आहे. आठ दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेनतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला युवा सेना तालुका प्रमुख सचिन खाडे, शिवसेना उपयुवा सेना प्रमुख वैभव डांगे, शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन शेट्टे, शिवसेना उपशहर प्रमुख सुभाष गोठ, रमेश भिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)