जीव वाचवणाऱ्या सुनीलचा रोटरी क्लबद्वारा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:13+5:302021-06-26T04:20:13+5:30

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मंगळवारी मध्यरात्री नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चालू रेल्वे गाडीत सामान चढवून उतरताना प्रवासी पडला व रुळाखाली ...

Rotary Club honors Sunil for saving his life | जीव वाचवणाऱ्या सुनीलचा रोटरी क्लबद्वारा गौरव

जीव वाचवणाऱ्या सुनीलचा रोटरी क्लबद्वारा गौरव

Next

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मंगळवारी मध्यरात्री नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चालू रेल्वे गाडीत सामान चढवून उतरताना प्रवासी पडला व रुळाखाली येणार, अशातच तेथे उपस्थित आरपीएफच्या जवान सुनील पासवान याने त्याला ओढून वाचवले. या शौर्याबद्दल रोटरी क्लब बल्लारपूरच्या आंतराष्ट्रीय समाजसेवी संस्थेने सुनीलचा सत्कार केला.

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील आरपीएफच्या कार्यालयात जखमी झालेला प्रवासी सुरेश कुकरेजा यांच्यासह जाऊन आरपीएफ जवान सुनील पासवान यांचा सत्कार केला.

यावेळी रोटरी क्लबचे कल्पेश पटेल, प्रशांत भोरे, प्रशांत दोंतुलवार व इतर सदस्य उपस्थित होते. जीवदान मिळालेल्या सुरेश कुकरेजा यांनी सर्वांना मिठाई वाटप केली. यावेळी आरपीएफ ठाण्याचे ठाणेदार महेंद्रकुमार मिश्रा हे उपस्थित होते.

Web Title: Rotary Club honors Sunil for saving his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.