लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोकड व मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अवघ्या दोन तासात रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपींकडून नगदी दहा हजार रुपये व सहा हजार ५०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल हस्तगत केले.प्रकाश प्रेम राजपुत (२२) रा. शांतीनगर बंगाली कॅम्प, राहुल चित्तरंजन खैराती (२२) रा.बंगाली कॅम्प, रोहित राजेश शेट्टी (२६) रा. इंस्तीयल परिसर चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत. मूल-नागपूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक ट्रकचालकाला थांबवून त्याच्याकडून दहा हजार रुपये, दोन मोबाईल हिसकावून घेतले.याबाबतची तक्रार ट्रकचालकाने रामनगर पोलीस स्टेनशमध्ये केली.पोलिसांनी कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून लगेच आपली चक्रे फिरवून तिघांना अटक करुन त्यांच्याकडून रोकड व मोबाईल हस्तगत केले.ही कारवाई उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात दैनिक अधिकारी खैरकार, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोहवा कामडी, नापोशि चौधरी, नापोशि चिकाटे यांनी केली.
चाकूच्या धाकावर ट्रकचालकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST
प्रकाश प्रेम राजपुत (२२) रा. शांतीनगर बंगाली कॅम्प, राहुल चित्तरंजन खैराती (२२) रा.बंगाली कॅम्प, रोहित राजेश शेट्टी (२६) रा. इंस्तीयल परिसर चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत. मूल-नागपूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक ट्रकचालकाला थांबवून त्याच्याकडून दहा हजार रुपये, दोन मोबाईल हिसकावून घेतले.
चाकूच्या धाकावर ट्रकचालकाला लुटले
ठळक मुद्देदोन तासात आरोपींना अटक, गुन्हे शोध पथकाची कारवाई