कीर्तीकुमार भांगडीया : रस्त्यांच्या बांधकामासाठी ३७५ कोटींचा निधी मंजूरलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी तालुक्यात विकासकामाचा सपाटा सुरु केला आहे. त्यामध्ये रस्ते, पूल, सभागृहे, विविध स्तरावर विकास कामे प्रगती पथावर सुरु असताना शंकरपूर, महालगाव, भिसी, चिमूर, पळसगाव या महामार्गाच्या कामासाठी आ. र्कीतीकुमार भांगडीया यांनी प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नाला यश येऊन रस्त्याच्या बांधकामासाठी ३७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या महामागाचे सर्वेचे काम नुकतेच उपग्रहाद्वारे करण्यात येत आहे. शंकरपूरपासून या सर्व्हेला सुरुवात झाली आहे.प्रथमच चिमूर विधानसभा क्षेत्रात लीडर सर्व्हेद्वारे पाहणी करण्यात आली असून सदर सर्व्हे उपग्रहावरून जोडणी करून प्रक्षेपणाद्वारे केल्या जात आहे. रस्त्यांच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला १५० मीटर रुंदीची पाहणी केली जाते. सदर सर्व्हे एका रुग्णवाहिका एवढ्या आकाराच्या जाडीमध्ये अत्याधुनिक मशिनी बसवलेल्या असून त्याला एक स्कॅनर मशीन जोडलेली आहे. रस्त्याच्या प्रत्येक सहा मीटर अंतरावर फोटो घेतले जाते. प्रत्येक किमीला १ एक हजार आठ रुपयांचा खर्च येतो. सर्व्हेचे वाहन ४० किमी वेगाने धावून सर्व्हे करते. अशाप्रकारचे सर्व्हे फक्त विकसनशिल देशात केले जातात. बंगळुरू येथील मुख्यालयी माहिती पुरवून रस्त्यांच्या बाधकामाची आखणी केली जाते. आ. कीर्तीकुमार भांगडीया यांच्या पाठपुराव्याने शंकरपूर महालगाव, भिसी, चिमूर, मासळ, पळसगाव मार्गे रस्ता कामास ३७५ कोटी रुपये मान्यता देऊन मंजुरी दिली असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांनी दिली. विनोद अढळ, एकनाथ थुटे, आकाश डाहूले, कोरेकर, पायल कापसे आदी उपस्थित होते.
उपग्रहाद्वारे रस्त्यांच्या कामांचा सर्वे
By admin | Updated: June 18, 2017 00:39 IST