क्रांती दिन ठरला आंदोलन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:32 AM2019-08-10T00:32:46+5:302019-08-10T00:33:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ९ आॅगस्ट हा क्रांती दिवस ‘आंदोलन’ दिवस ठरला. चंद्रपुरात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण ...

Revolution day became agitation day | क्रांती दिन ठरला आंदोलन दिन

क्रांती दिन ठरला आंदोलन दिन

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात जि.प. कर्मचाऱ्यांचे उपोषण : ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांची जिल्हाभर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ९ आॅगस्ट हा क्रांती दिवस ‘आंदोलन’ दिवस ठरला. चंद्रपुरात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. क्रांतीभूमी चिमुरात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी रास्तारोको व जेलभरो आंदोलन केले तर ग्रामसेवकांनी जिल्हाभर असहकार आंदोलन करीत शासकीय धोरणाविरोधात निदर्शने दिली. त्यामुळे आजचा दिवस जिल्ह्यात विशेष ठरला.

अंगणवाडीतार्इंचा चिमुरात रास्तारोको व जेलभरो
चिमूर : शालेय पुर्व शिक्षण व सकस आहारांची महत्त्वपूर्ण कर्तव्य करणाºया अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध न्याय मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेकरिता चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) यांच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. आपल्या न्याय मागण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान अखलाख कुरेशी यांच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाºयांनी रस्त्यावर उतरून शासणविरोधी घोषणा देऊण संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून कर्मचाºयांच्या मागण्या मान्य करून तसेच त्यांच्या समस्या सोडवून न्याय देण्यात याव्या, अशी मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचारी सभा विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहेत. त्याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली देऊन व त्यांच्या स्मृतीच्या साक्षीने दुपारी २ वाजताच्या दरम्यान न्याय मागण्या संबधात सरकारच्या उदासीन वृत्तीचा निषेध करून शासनविरोधी घोषणा देऊन चिमूर वरोरा मार्गावर रास्ता रोको करण्यात आले. प्रलंबित मागण्यांचे निवेदनात थकीत मानधन द्यावे, प्रधानमंत्र्यानी ११ सप्टेंबर २०१८ रोजी घोषित केलेली मानधन वाढ द्यावी, निवृत्त कर्मचाºयांना मानधनाच्या अर्धे मानधन मिळावे, एक रकमी सेवा निवृत्ती वेतन त्वरित द्यावे, अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलचे गहाळ अथवा तुट्फुट झाल्यास त्यांना भुर्दंड न करता शासनाने त्या मोबाईलचा विमा करावा.
सेविका व मदतनिसांची रिक्त पदे त्वरित भरावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान कुरेशी, चिमूर तालुका अध्यक्ष माधुरी वीर, वरोरा तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा हिरादेवे, उपाध्यक्ष पुष्पा ठावरी, भद्रावती तालुका उपाध्यक्ष सांजना बंडावार, सचिव निराशा चौधरी, सुलोचना पडोळे, नंदा वरघने, इंदिरा आत्राम, नंदा आवारी, सुनिता भोपे, कमल वाकडे, सविता बोरकर, वैशाली ढोक, करुणा गुरुनुले व पदाधिकारी उपस्थित होते. सदर आंदोलनात चिमूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड तथा ब्रम्हपुरी येथील अंगणवाडी कर्मचारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या.
 

Web Title: Revolution day became agitation day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा