लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. मागण्या पूर्ण न झाल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.विभागीय अध्यक्ष तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू धांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले.कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे ४३०० करावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करावे. आकृतीबंधाबाबत दांगट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नायब तहसीलदार पदावर घेण्यात येत असलेल्या ३३ टक्के पदांची टक्केवारी कमी करुन २० टक्के करावी, कर्मचाºयांना परिक्षेच्या माध्यमातून वरिष्ठ पदावर जाण्याची संधी द्यावी, वर्ग चारच्या पदाची वर्ग तीनमध्ये पदोन्नती करताना तलाठी संवर्गातसुद्धा देण्यात यावे, यासह अशा अनेक मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाने अधिकाºयांना दिले असून मागण्या पूर्ण न झाल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला.कार्यालयात शुकशुकाटमहसूल विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयांमध्ये संपकाळात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याठिकाणचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची काही कामे होऊ शकली नाही.
महसूल कर्मचाऱ्याचे प्रश्न अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:31 IST
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे ४३०० करावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करावे. आकृतीबंधाबाबत दांगट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नायब तहसीलदार पदावर घेण्यात येत असलेल्या ३३ टक्के पदांची टक्केवारी कमी करुन २० टक्के करावी, कर्मचाºयांना परिक्षेच्या माध्यमातून वरिष्ठ पदावर जाण्याची संधी द्यावी,
महसूल कर्मचाऱ्याचे प्रश्न अधांतरीच
ठळक मुद्देलाक्षणिक संप: ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा