शंकरपूर : मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे. वनच जर नसेल तर या पृथ्वीतलावर मानवी जीवन राहणार नाही. त्यामुळे वनाचे रक्षण करणे सर्वांचीच जवाबदारी आहे, असे प्रतिपादन चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी के.आर. आक्केवार यांनी केले.ते शंकरपूर जवळील चकजाटेपार येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने शुक्रवारी आयोजित सभेत बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे अमोद गौरकर, वनपाल एस.डी. डांगे चकजाटेपवार संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नागोसे, डोंगरगावचे मनोहर राणे, सरपंच लिला राणे, वनरक्षक भवने, जयदेव मून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी श्रमदानातून गावालगत असलेल्या झुडपी जंगलातील झाडांची छाटणी केली. गावातील जनतेने वन व वन्यप्राण्यांचे रक्षण करणे व वन जागेवर अतिक्रमण करणार नाही याची जवाबदारी त्यांनी स्वीकारली.कार्यक्रमाचे संचालन व आभार वनरक्षक भवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
वनांचे रक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी - आक्केवार
By admin | Updated: November 10, 2015 01:37 IST