रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : कोरपना ते गडचांदूर या मार्गाची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गडचांदूर येथे सिमेंट कंपन्या असल्यामुळे या मार्गावर नेहमीच जड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याचे सिमेंटीकरण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मजुर मिळत नसल्याने
शेतकरी त्रस्त
राजुरा : सध्या कापसाची वेचणी सुरु आहे. मात्र कापूस वेचनीसाठी मजूरच मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे पहाडावरील मजुरांची मनधरणी केली जात आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कापसाला पाहिजे तसा भाव नसतानाही वेचनीसाठी मजुरांना ५ ते ८ रुपये दर द्यावा लागत आहे.त्यामुळे कापूस वेचनीचे नवे तंत्रज्ञान विकसीत करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
रस्त्यावरील सांडपाण्याने
आरोग्य धोक्यात
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही, असा आरोप होत आहे.
स्थानिक युवकांना रोजगार
देण्याची मागणी
कोरपना : तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार वाम मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरभरती बंदी असल्याने बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.
रस्त्यावर वाहन
ठेवणाºयांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाºया सहा वाहनचालकांवर सोमवारी वेगवेळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बिनबा वार्डात
घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : बिनबा वार्डात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात नियमित स्वच्छता होत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे
जिवती-गडचांदूर
मार्गावरील खड्डे बुजवा
जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विविध योजनांची
जनजागृती करावी
चंद्रपूर: शासनाकडून सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहे. कोरोना काळातही काही योजना सुरू आहेत. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्याची नागरिकांनी केली आहे.
भानापेठ वार्डातील
नाल्या तुंबल्या
चंद्रपूर : भानापेठ वार्डातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वार्डातील नाल्या उपसा काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना तातडीने वार्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.