शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पेरजागडावर धार्मिक स्वयंपाकावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:07 IST

तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देभाविकांमध्ये असंतोष : आता घरी अन्न शिजवून गडावर भोजन करण्यास परवानगी

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.गोविंदपूरजवळ पेरजागड नावाचे पहाड असून त्यावर मंदिर आहे. याठिकाणी शिवरात्री व मकर संक्रांतीच्या पर्वावर मोठी यात्रा भरते. परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिक या यात्रेत सहभाग दर्शवितात. केवळ सहभागच नाही तर पुजाअर्चा झाल्यानंतर श्रद्धेने सामुदायिक भोजनाचे आयोजनही करतात. विशेष म्हणजे, या मंदिर परिसरात वर्षभर सामुदायिक भोजनाचे आयोजन करण्याची परंपरा आहे. या भागात धानाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. धानाची रोवणी आणि कापणी झाल्यानंतर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी भेट देऊन सहभोजन करतात.मागील काही वर्षांपासून हे स्थळ परिसरातील लोकांच्या श्रद्धास्थानासोबतच पर्यटनस्थळही झाले आहे. मात्र शासनाने नुकतेच घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित केले. हे स्थळ घोडाझरीलगत असल्याने घोडाझरी अभयारण्याच्या कक्षेत गाव समाविष्ट करण्यात आले आहे. अभयारण्याच्या नियमानुसार याठिकाणी स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे.पर्यटक किंवा भाविकांना भोजन करावयाचे असल्यास तिथे त्यांना बाहेरून अन्न शिजवून आणावे लागणार आहे. परंतु, मंदिर परिसरात स्वयंपाक करून जेवण करता येणार नाही. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर बंधन घातल्याने तालुक्यातील भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.भाविकांचे श्रद्धास्थाननागाभीड तालुक्याच्या अगदी टोकावर असलेल्या या स्थळावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. शासकीय गॅझेटमध्ये पेरजागड म्हणून डोंगराची नोंद आहे. संपूर्ण डोंगर ३५ किमी अंतराचे असून डोंगराला सातबहिणीचे डोंगर या नावानेही ओळखल्या जाते. परिसरात वास्तव्याला असलेल्या गोंड, गोवारी, माना, ढिवर आदी जाती-जमातींचे नागरिक श्रद्धेने पूजा करतात. अनेक पिढ्यांपासून ही पंरपरा सुरू आहे. कृषी संस्कृतीशी संबंधित असलेला हा समाज येथे सतत दर्शनाला येतो.

टॅग्स :forestजंगलGhodazari Damघोडाझरी धरण