शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

अधिकाऱ्याविना आरोग्य केंद्राचा कारभार वाऱ्यावर

By admin | Updated: June 20, 2015 01:57 IST

आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १५ दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी गैरहजर ...

विरुर (स्टे) : आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १५ दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गर्भवती प्रसुतीसाठी महिलांना घरीच किंवा खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा, औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आल्या पावली परत जावे लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव, शेतकरी, शेतमजूर, कामगार वास्तव्याला आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांना उपचारासाठी पदरमोड करून खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ेदुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक प्रसुती ही शासकीय रुग्णालयातच व्हावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र तसे होत नाही. प्रसुतीसाठी गर्भवती महिलांना आरोग्य केंद्रात आणले असता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने गर्भवती महिलांना घरीच प्रसुती करून घ्यावी लागते. प्रसंगी खासगी रुग्णालयात जावे लागते. या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालकाचे पद मागील कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे. या आरोग्य केंद्रात २२ कर्मचारी कार्यरत असले तरी केवळ एक परिचारिका व एक दोन कर्मचारी मुख्यालयी राहतात. आठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. उर्वरित कर्मचारी बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात. तसेच येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली. १५ दिवसांचा कालावधी होऊनही त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. या आरोग्य केंद्रावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. विरुर स्टेशन येथे पोलीस ठाणे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कधीही आरोग्य केंद्राची गरज भासते. मात्र कधी-कधी वैद्यकीय अधिकारी नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच रुग्णांनासुद्धा आल्यापावली उपचाराविना परत जावे लागते. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. मात्र मात्र त्या निवासस्थानात अधिकारी राहत नाहीत. रुग्णवाहिका असेल तर चालक नाही. चालक असेल तर वाहनात इंधन नाही, अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. अशी केविलवाणी स्थिती चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राची झाली आहे. येथील दोन वैद्यकीय अधिकारी व रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावी, अशी मागणी माजी सरपंच धनराज चिंचोलकर, सरपंच बंडू रामटेके, राजकुमार ठाकूर, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग वडस्कर, स्वामी सालगमवार, संतोष मेडपुरवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर) आरोग्य सेवेचा बोजवाराग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे तसेच आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. १९८२ साली स्थापन झालेल्या या आरोग्य केंद्रात एकूण २८ गावांचा समावेश आहे. जवळपास ३० हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. परंतु अपुरा औषधसाठा व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे बाहेरगावावरुन आलेल्या रुग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे.