शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणात लाल परी रुसली, प्रवाशांचे हाल, एसटीचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे महामंडळाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: नागपूर, तसेच इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांना  खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसामध्ये प्रवाशांचे बेहाल सुरू आहे. दरम्यान, खासगी वाहनांचा प्रवाशांना आधार घ्यावा लागत असून, यामध्ये त्यांच्या खिशाला आर्थिक ताण पडत आहे, तर महामंडळाचेही कोट्यवधींचे नुकसान होत आहे.शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, घरभाडे, बोनस आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मागणीवर अद्यापही शासकीय स्तरावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून संप सुरूच आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जाते. त्यातच सुटी आणि कामाचे तास यामध्येही त्यांना त्रास होतो. त्यामुळे कुटुंब चालविणे, तसेच कुटुंबाकडे लक्ष देणे  कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसले  आहे. किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे महामंडळाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: नागपूर, तसेच इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांना  खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. 

अग्रीमपासून वंचितदिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना बोनससह अग्रीमचे दहा हजार रुपये दिले जातात. यावर्षी अग्रीमची रक्कम मिळाली नाही. एसटीतील कर्मचाऱ्यांना केवळ अडीच हजार बोनस दिला जातो. मागील वर्षी तोही देण्यात आला नाही. आधीच वेतन कमी, त्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अग्रिमची रक्कमही हाती आली नाही.

खासगी वाहतूकदारांची मनमर्जीऐन दिवाळीच्या दिवसांतच एसटीने संप पुकारल्यामुळे खासगी वाहतूकदारांना चांगले दिवस आले आहेत. प्रवाशांना नाइलाजाने ट्रॅॅव्हल्ससह अन्य वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. 

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप