शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीच्या जमिनीचे वनविभागाकडून परस्पर हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:42 IST

एका आदिवासी शेतकऱ्याची शेतजमीन मध्यचांदा वनविभागाने परस्पर लघू पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. ही जमीन वनविभागाच्या अखत्यारित नसतानाही जमिनीचे परस्पर हस्तांतरण करण्यात आल्याचे अफलातून प्रकरण बल्लारपूर तालुक्यातील आहे.

ठळक मुद्देअधिकार अभिलेख शेतकऱ्याचेच नावेमोबदल्यासाठी झिजवतोय शासनाचे उंबरठे

राजेश भोजेकर/आनंद भेंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका आदिवासी शेतकऱ्याची शेतजमीन मध्यचांदा वनविभागाने परस्पर लघू पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत केली. इतकेच नव्हे, त्या जमिनीचा मोबदलाही लाटला आहे. ११ सप्टेंबर २०१४ मध्ये वनविभागाने आपला मालकी हक्क सांगून हस्तांतरीत केलेल्या या जमिनीच्या सातबारावर आजही सदर शेतकऱ्याचेच नाव आहे. ही जमीन वनविभागाच्या अखत्यारित नसतानाही जमिनीचे परस्पर हस्तांतरण करण्यात आल्याचे अफलातून प्रकरण बल्लारपूर तालुक्यातील आहे.बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील रविंद्र फकरु आत्राम यांच्या सन १९४२ पासून मालकीची व ताब्यात असलेली मौजा आष्टी ता. बल्लारपूर येथील शेत सर्व्हे नंबर ६३ मधील ०.२२ हे.आर. जमीन वनविभागाने लघु पाटबंधारे विभागाच्या पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेकरिता ११ सप्टेंबर २०१४ मध्ये हस्तांतरीत केली आहे. सदर जमिनीचे मालक रविंद्र आत्राम असून जमिनीचा सन २०१८ पर्यंतचा सातबारा दोन्ही विभागाला देण्यात आला आहे. तरीसुद्धा मध्य चांदा वन विभागाने या जमिनीवर आपला हक्क दाखवून सदर आदिवासी शेतकऱ्याला मोबदलापासून वंचित ठेवण्याचा घाट रचला. गणू पेंटा गोंड यांना सन १९१४-४२ मध्ये शेत सर्व्हे नंबर ६३ मधील ०.२२ हे. आर. शेतजमीन तबदीलात फेहरिस्त अन्वये मिळाली होती. ती जमीन आजही नातू रविंद्र आत्राम व इतर यांच्या ताब्यात आहे.

गौडबंगाल झाल्याचा संशयया प्रकरणात तसेच रविंद्र आत्राम यांनी दि.९ मार्च २००१८, १७ मे २०१८, १४ मार्च २०१८ ला पत्र देवून जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार अभिलेखात बदल केलेल्या पत्राची मागणी केली असता तेसुद्धा सदर शेतकऱ्याला अद्याप देण्यात आले नाही.हक्काच्या जमिनीच्या मोबदल्यापासून रविंद्र आत्राम या आदिवासी शेतकऱ्याला हेतुपूरस्पर वंचित ठेवले जात असल्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येते. एकंदर घडामोडींवरून या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाल्याचा संशय आहे.

अधिकार अभिलेखानुसारही शेतकरीच मालकमालकी हक्काबाबत चंद्रपूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे पत्र क्र. ३४८६ दि. ९ सप्टेंबर २०१६ अन्वये सदर अधिसूचित संरक्षित वनक्षेत्राचे महसूल विभागाकडून अवैधरित्या पट्टे वाटप करण्यात आले आहे. सदर क्षेत्राचे महसूली अधिकार अभिलेखात बदल करण्यात आला असल्याचे मध्य चांदा वन विभागाने एका पत्रात म्हटले आहे. त्यापोटी पर्यायी वनीकरण आणि एनपीव्हीकरिता ७८ लक्ष ६८ हजार रुपये वन विभागाला हस्तांतरीतही केले असल्याचे पत्रात नमुद आहे. आदिवासी शेतकरी रविंद्र आत्राम व इतर आजही मौजा आष्टी येथील शेत सर्व्हे नं. ६३ चे अधिकार अभिलेखनुसार मालक आहेत. मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी कोणत्या आधारे महसुली अधिकार अभिलेखात बदल केला, हे मात्र हे कळायला मार्ग नाही. सर्व्हे नं. ६३ हे वन विभागाशी संबंधीत नसल्याचे मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या २२ सप्टेंबर २०१० च्या पत्र क्र. १२ सर्व्हे/जमीन/१६६४ अन्वये दिसून येते.मालकी हक्काबाबत चंद्रपूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे पत्र क्र. ३४८६ दि. ९ सप्टेंबर २०१६ अन्वये सदर अधिसूचित संरक्षित वनक्षेत्राचे महसूल विभागाकडून अवैधरित्या पट्टे वाटप करण्यात आले आहे. सदर क्षेत्राचे महसूली अधिकार अभिलेखात बदल करण्यात आला असल्याचे मध्य चांदा वन विभागाने एका पत्रात म्हटले आहे. त्यापोटी पर्यायी वनीकरण आणि एनपीव्हीकरिता ७८ लक्ष ६८ हजार रुपये वन विभागाला हस्तांतरीतही केले असल्याचे पत्रात नमुद आहे. आदिवासी शेतकरी रविंद्र आत्राम व इतर आजही मौजा आष्टी येथील शेत सर्व्हे नं. ६३ चे अधिकार अभिलेखनुसार मालक आहेत. मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी कोणत्या आधारे महसुली अधिकार अभिलेखात बदल केला, हे मात्र हे कळायला मार्ग नाही. सर्व्हे नं. ६३ हे वन विभागाशी संबंधीत नसल्याचे मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या २२ सप्टेंबर २०१० च्या पत्र क्र. १२ सर्व्हे/जमीन/१६६४ अन्वये दिसून येते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी