शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

रेन वॉटर हार्वेस्टिंगला पुन्हा ठेंगाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ही सिस्टीम नसली तर बांधकामाला मनपाकडून परवानगी देण्यात येणार नाही, असाही धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करताना मनपाने गंभीरता दाखविली नाही.

ठळक मुद्देचालू वर्षात केवळ दोनशे इमारतींवर बसवली सिस्टीम : पावसाळा बरसला; मात्र पाणी जमिनीत मुरले नाही

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. अगदी आॅक्टोबर, नोव्हेबर महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावली. पावसाचे हे पाणी जमिनीत मुरावे, शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टीम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला. मात्र त्यानंतर मनपाला आपल्या धोरणाचा विसर पडल्याचे दिसते. चालू वर्षात चंद्रपुरात केवळ दोनशेच्या जवळपास इमारतधारकांनी आपल्या इमारतींमध्ये ही सिस्टीम बसविली. इतर नागरिकांना याकडे पाठच फिरविली. त्यामुळे यंदा चांगला पाऊस येऊनही पावसाचे पाणी जमिनीत मुरु शकले नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत यावर्षीही नागरिकांमध्ये उदासीनताच दिसून आली.चंद्रपूर शहराला हॉट सिटी म्हणून संबोधले जाते. येथील उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात ४९ अंश सेल्सीयसपर्यंत चंद्रपूरचे तापमान पोहचते. विशेष म्हणजे, सगळीकडे उन्हाळा चार महिन्यांचा असला तरी चंद्रपुरात तो सहा महिन्यांचा असतो, असे आजवरचा अनुभव आहे. तीव्र उष्णतामानामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. त्यामुळे जलस्रोत आटून अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे पाणी जमिनीत मुरणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज बघता घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसणे गरजेचे आहे.दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेने शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ही सिस्टीम नसली तर बांधकामाला मनपाकडून परवानगी देण्यात येणार नाही, असाही धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करताना मनपाने गंभीरता दाखविली नाही. यावर्षी सरासरी ओलांडून पाऊस बरसला. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टममुळे हे पाणी जमिनीत मुरणे आवश्यक होते. त्यासाठी मनपाने जोरदार जनजागृतीदेखील केली होती. मात्र काही इमारतींचा अपवाद वगळता इतर चंद्रपूरवासीयांनी याला प्रतिसाद दिला नाही. जवळजवळ शहरातील ८५ चटक्के इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्याचे पाणीही जमिनीत न मुरता नाल्यांवाटे वाहून गेले.सवलत देऊनही नागरिकांची पाठचचंद्रपूर मनपा हद्दीत असलेल्या ज्या इमारतधारकांनी आपल्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली असेल, त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देण्याचाही निर्णय तेव्हा मनपाने घेतला आहे. यासोबतच सदर सिस्टीम बसविण्यासाठी २५०० रुपयांचे अनुदानही दिले जाते. असे केल्याने मालमत्ताधारक स्वयंस्फूर्तीने ही सिस्टीम बसवतील, असे मनपाला वाटले. मात्र तसे झाले नाही. मनपाने याबाबत अधिक तगादा लावला नाही. त्यामुळे बहुतांश इमारतधारक या सिस्टीमच्या भानगडीत पडले नाही.नद्यांचे पात्रही झपाट्याने आटतेचंद्रपूर शहराला लागून इरई व झरपट या दोन नद्या आहेत. यातील झरपट नदीचे तर केव्हाच वाटोळे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस सोडले तर या नदी पात्रात तुरळक पाणी असते. इरई नदीत बºयापैकी पाणी असते. मात्र उन्हाळ्यात या नदीचे पात्रही तळ गाठते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी आणखी जलदगतीने खाली जाते. परिणाम चंद्रपूर शहरात व्यापक प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविणे गरजेचे झाले आहे. 

जनजागृतीचा अभावशहरातील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविणे हा महत्त्वाकांक्षी निर्णय होता. यात लोकसहभाग मिळविण्यासाठी मनपाकडून व्यापक जनजागृती व सततचा पाठपुरावा अपेक्षित होता. मात्र मनपा प्रशासन असे करण्यात अपयशी ठरले. खुद्द मनपा प्रशासनच याबाबत गंभीर नसल्याने चंद्रपूरकरांनीही ही बाब गंभीरतेने घेतली नाही.

टॅग्स :Rainपाऊस