शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शासकीय इमारतीत साठवणार पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:04 IST

नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टिंग होणार सक्तीची

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय इमारतीत यापुढे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.वाढती लोकसंख्या, झपाटयाने होणारे शहरीकरण, वेगाने कमी होत जाणारे जंगलाचे क्षेत्र, शहरासह ग्रामीण भागातही वाढत चालले प्रदूषण या सर्वांचा परिणाम पाणी साठयावरही होऊ लागला आहे. पाणी उपलब्धतेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामुळे पावसाचे उपलब्ध होणारे पाणी अधिक काळजीपूर्वक साठवले, तर त्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. यामुळे पाण्याची बचत आणि संवर्धन होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रेन वॉटर हार्वेस्टींगचा वापर बांधकामात वाढत चालला आहे.राज्य शासनानेही आपल्या सर्वच शासकीय इमारती हरित इमारत संकल्पनेद्वारे उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच आता नव्याने बांधण्यात येणाºया इमारतीत ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे नव्याने बांधण्यात येणाºया इमारतीच्या अंदाजपत्रकात रेन तसेच रूफ वॉटर हार्वेस्टींगची आवश्यक तरतूद प्राधान्याने करण्याचे आदेश दिले आहेत.इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी शास्त्रीय पद्धतीने संकलित करून ते उपलब्ध जागेत जमिनीवर अथवा जमिनीखाली टाकी बांधून साठवून ठेवावे, साठवलेल्या पाण्याची आवश्यकतेप्रमाणे प्रक्रिया करून हे पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य सर्व उपयोगासाठी आणण्यासाठी नियोजन करावे, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.ज्या शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते, अशा अस्तित्वातील इमारतींच्या बाबतीत प्राधान्याने रेन वॉटर हार्वेस्टींगची कामे देखभाल दुरुस्ती अंतर्गत असलेल्या निधीतून अथवा जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करून पूर्ण करून घ्यावीत, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात चांगली संधीचंद्रपूर हा पाणीदार जिल्हा आहे. पावसाचे प्रमाणही चांगले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टींग केले तर मोठया प्रमाणात पाणी साठवणूक होऊ शकते. या पाण्याचा वापर बगिचे विकसित करण्यासह स्वच्छतागृहांसाठी होऊ शकतो. अशा अनेक कार्यालयांत या निर्णयाचा मोठा फायदा होऊ शकतो.इंटरनेटची मदत घ्यारेन तसेच रूफ वॉटर हार्वेस्टींगसाठी इंटरनेटवर माहिती उपलब्ध असते. इमारतीच्या छताचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण यानुसार वेबसाईटवर विविध पद्धती उपलब्ध आहेत, परिस्थितीनुरूप योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, त्याकरिता इंटरनेटची मदत घ्यावी, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस