शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची वाय-फाय सुविधा हवेतच; प्रवासीच आहेत अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही. 

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रमुख रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यांतर्गत बल्लारपूर रेल्वे जंक्शन येथे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र बरेचदा ही वाय-फाय सेवा बंदच राहत असल्याचे दिसून येते. प्रवाशांनादेखील या वाय-फाय सेवेची माहिती नसल्याने ही वाय-फाय सेवा  नावालाच असल्याचे बोलले जाते. रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते सहा महिन्यांचे अनलिमिटेड नेट उपलब्ध असल्याने या वाय-फायचा वापर करताना दिसून येत नाही. 

प्रवाशांना वाय-फाय ठाऊकच नाही

अनेकदा रेल्वेने प्रवास केला. मात्र रेल्वेस्थानकावर रेल्वे विभागातर्फे वाय-फाय सेवा मोफत आहे. याबाबत आपणाला पुसटशी कल्पनाही नाही. तसेच कुठे फलकही लावला नसल्याने कधीच या वाय-फाय सेवेचा उपभोग घेतला नाही.-प्रशांत खोब्रागडे

आजपर्यंत अनेक छोटमोठ्या स्टेशनवरून रेल्वेने प्रवास केला. मात्र याबाबत माहितीच नाही. तसेच रेल्वेस्थानकावर असताना कधी मोबाइलवर वाय-फायसंदर्भात तशा प्रकारचे नोटिफिकेशन आल्याची माहिती नाही. त्यामुळे कधीच रेल्वेस्थानकावर वायफाय सेवेचा वापर आपण केला नाही.-प्रतिश मोटघरे

पॅसेंजर अद्यापही बंदसद्य:स्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून २८ रेल्वे धावत आहेत. मात्र या रेल्वेला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे रिकाम्याच धावत असल्याचे दिसून येतात. त्यातच पॅसेंजर रेल्वे अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांची मोठी पंचायत होत आहे.

रेल्वेस्थानकावर येणाऱ्या सर्वांसाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश प्रवासी या सेवेचा उपभोग घेतात. रेल्वे कर्मचाऱ्यांपासून अधिकारीसुद्धा या सेवेचा वापर करतात. ही वाय-फाय सेवा सुरळीत सुरू आहे. रामलाल सिंग, स्टेशन मास्तर

 

टॅग्स :railwayरेल्वेWiFiवायफाय