शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या आक्रोशात 16 घरांवर रेल्वेचा बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST

माजरी येथे रेल्वेच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधून रहिवास सुरू केला. अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण हटविणार नाही, या मानसिकतेत ही मंडळी असताना रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना आपले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावरून नागरिकांनीही या सूचनेला कडाडून विरोध दर्शविला. इतकेच नव्हे, तर माजरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुचना : रेल्वेच्या जागेवर कित्येक वर्षांपासून पक्की घरे बांधून राहत असलेल्या १६ घरांवर व दुकानांवर अखेर सोमवारी सकाळी ७ वाजता रेल्वेचा बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आली. ४०० पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. एकाएकी आपले राहते छत उघडे पडल्याने अतिक्रमणधारकांचा आक्रोश सुरू होता.माजरी येथे रेल्वेच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधून रहिवास सुरू केला. अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण हटविणार नाही, या मानसिकतेत ही मंडळी असताना रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना आपले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावरून नागरिकांनीही या सूचनेला कडाडून विरोध दर्शविला. इतकेच नव्हे, तर माजरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात आले. येथे वास्तव्यास असणारे नागरिक  कुठे जातील, ही बाब लक्षात घेऊन लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने घरे जमिनदोस्त केली.

संघर्ष समितीचे पदाधिकारी नजरकैदेत  माजरी येथील संघर्ष समितीचे पदाधिकारी राजेश रेवते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास रत्नपारखी व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, सरपंच जंगमताई माजरीतील शेकडो स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यवाहीला तीव्र विरोध केला होता. रेल्वे प्रशासनाने या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्याला सुरुवात केली. तेव्हा रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. जनतेचा वाढता विरोध पाहून माजी जि. प. सदस्य प्रवीण सूर, राजेश रेवते व उल्हास रत्नपारखी यांना माजरी पोलिसांनी नजरकैद करून पोलीस ठाण्यात ठेवले. त्यानंतर  नागरिकांचा आक्रोश व विरोध मोडून काढत जेसीबीच्या साह्याने १६ घरे व दुकाने रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात आली.

१४९ कलमाचा आधार, छावणीचे स्वरूप- या कार्यवाहीला विरोध होऊ नये, यासाठी परिसरात कलम १४९ लावण्यात आले होते. मोठा पोलिसांचा फौजफाटा असल्याने क्षणात राहती घरे व परिवार जगविण्याचे साधन असलेली दुकाने बेचिराख करण्यात आली. कार्यवाही सुरू असताना सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. तर सर्व रहदारीच्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त असल्याने माजरी गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

 अश्रू अनावर, आता आपण राहायचे कुठे?- आपल्या डोळ्यादेखत वर्षानुवर्षांपासून राहत असलेली घरे भुईसपाट होताना पाहून त्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. आता आपण बेघर झाल्याने आता पुढे राहायचे कुठे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? हे प्रश्न यावेळी उपस्थित होत होते. 

 

टॅग्स :railwayरेल्वेEnchroachmentअतिक्रमण