शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता अध्यक्षपदी कायम रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:31 IST

काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज शुक्रवारी एकमताने मंजूर केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश व मुंबई काँग्रेसचा प्रस्तावखा. बाळू धानोरकरांचा प्रदेश काँग्रेसने केला सत्कार.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज शुक्रवारी एकमताने मंजूर केला.आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मांडला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात मा. प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. सोशल इंजिनयरिंगच्या माध्यमातून सर्व समाजातील तरूणांना व नविन नेतृत्वाला संधी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तसेच नवनियुक्त खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.या बैठकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांशी चर्चा केली व आढावा घेतला.या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, जयवंत आवळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी सोनल पटेल, चेल्ला वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. वर्षा गायकवाड, आ. हर्षवर्धन सपकाळ, बाजीराव खाडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री आ. बसवराज पाटील, खा. हुसेन दलवाई, खा. बाळू धानोरकर, आ. भाई जगताप माजी खा. एकनाथ गायकवाड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एन एस यु आयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिकराव जगताप, अ‍ॅड. गणेश पाटील, पृथ्वीराज साठे, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Suresh Dhanorkarसुरेश धानोरकरcongressकाँग्रेस