शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणे टाळण्यासाठी रचला अपहरणाचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 23:31 IST

मुलाला शाळेत जायचेच नसल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. तो स्कूल बॅग घेऊन शाळेकडे निघाला. काही अंतरावर शेजारी नागरिक उभे होते. तेव्हा त्याच्या शर्टाचे बटण तुटलेले होते. तेव्हा नागरिकांनी त्याला विचारले असता त्याने आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. अपहरणकर्त्याने पेढा खायला दिला. मात्र, तो खाण्यास नकार दिला. एवढ्यात तोंडावर रुमाल ठेवून नेत असताना कशीबशी सुटका केल्याचे त्याने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत मुलगा मोबाइलवर गेम खेळत होता. वडिलाने मोबाइल हिसकावून शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, त्याला शाळेत जायचेच नव्हते. त्यामुळे त्याने थेट स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून आपण कसे सुटलो, अशी माहिती त्याने कुटुंबीयासह पोलिसांना दिली. अचानक घडलेल्या या घटनेने सारेच अचंबित झाले. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा बिंंग फुटले.  चित्रपटात शोभावा असा प्रकार बुधवारी चंद्रपुरात शहर पोलिसांनी उघडकीस आणला. चंद्रपूर येथील एका १३ वर्षीय मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याचे मोठे वेड आहे. तो तासनतास मोबाइलच गेम खेळत असतो. सोमवारी तो मोबाइलवर गेम खेळण्यात इतका गुंग झाला की, शाळेची वेळ केव्हा झाली, हे त्याला कळलेच नाही. शाळेची वेळ होऊनही मुलगा मोबाइलच बघत असल्याचे वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेत त्याला शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, मुलाला शाळेत जायचेच नसल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. तो स्कूल बॅग घेऊन शाळेकडे निघाला. काही अंतरावर शेजारी नागरिक उभे होते. तेव्हा त्याच्या शर्टाचे बटण तुटलेले होते. तेव्हा नागरिकांनी त्याला विचारले असता त्याने आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. अपहरणकर्त्याने पेढा खायला दिला. मात्र, तो खाण्यास नकार दिला. एवढ्यात तोंडावर रुमाल ठेवून नेत असताना कशीबशी सुटका केल्याचे त्याने सांगितले. ही घटना गंभीर असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी  कुटुंबीयांना माहिती देऊन बोलावून घेतले. कुटुंबीयांनी सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. एपीआय जयप्रकाश निर्मल यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही तपासले. यातही घटना उघडकीस न आल्याने पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता शाळेत जायचे नसल्याने बनाव रचल्याचे मान्य केले. या प्रकारामुळे पोलिसांसह कुटुंबीयही चक्रावून गेले. 

टीव्ही व मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोक्यात अशा कल्पना येत आहेत. त्यामुळे आपला मुलगा मोबाइलवर काय करत असतो, याबाबत पालकाने सतर्क असणे गरजेचे आहे. मुलाला मोबाइलपासून होणारे दुष्परिणाम समजावून सांगत विशिष्ट वेळेतच मोबाइल हाताळू द्यावा. -जयप्रकाश निर्मल, सहायक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर.

 

टॅग्स :KidnappingअपहरणStudentविद्यार्थी