चंद्रपुरात युतीत उमेदवारीसाठी चढाओढ; आघाडीत सस्पेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:54 AM2019-09-26T00:54:57+5:302019-09-26T00:56:33+5:30

काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या प्रयत्नातील सूर आहे. मेंढेंसोबतच पक्षातील अनेक मंडळी काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून आहे.

Race for candidacy in Chandrapur; Suspended lead | चंद्रपुरात युतीत उमेदवारीसाठी चढाओढ; आघाडीत सस्पेन्स

चंद्रपुरात युतीत उमेदवारीसाठी चढाओढ; आघाडीत सस्पेन्स

Next
ठळक मुद्देरणधुमाळी : उमेदवारांबाबत जनतेत उत्सुकता, जोरगेवारांचे काय?

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज मंडळींचे वास्तव्य असलेला चंद्रपूर विधानसभा मतदार संघ नेहमी चर्चेत असतो. या मतदार संघातील सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार अद्याप पडद्याआड असल्याने नवे चेहरे मैदानात उतरतील वा जुनेच चेहरे आमने-सामने येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा पहिला मतदार संघ. मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर जनतेनी सलग तीनवेळा त्यांना निवडून दिले. इतकेच नव्हे, तर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात गेल्या २५ वर्षांपासून मुनगंटीवार यांच्यामुळे कमळ फुलत आहे. २००९ मध्ये हा मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मुनगंटीवारांना बल्लारपूर मतदार संघाची निवड करावी लागली. भाजपने नाना श्यामकुळे यांना नागपुरातून चंद्रपुरात आणून उमेदवारी दिली. ते दहा वर्षांपासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु या काळात त्यांच्यामार्फत अपेक्षित विकासकामे न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. हाच धागा पकडून आपल्याला तिकीट मिळावी, यासाठी जि.प. सभापती ब्रिजभुषण पाझारे आणि राजेश मून यांच्या हालचाली सुरू आहे. पाझारे हे गेल्या काही महिन्यांपासून मतदारापर्यंत पोहचत आहे. यामुळे भाजप पक्षश्रेष्ठीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. या मतदार संघाची निवडणूक भाजपसाठी वाटते तितकी सोपी दिसत नसल्याचा सूर आहे. भाजप नाना श्यामकुळे यांच्यावरच तिसऱ्यांदा बाजी लावते, असे वरवर दिसत असले तरी अधिकृत घोषणेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या प्रयत्नातील सूर आहे. मेंढेंसोबतच पक्षातील अनेक मंडळी काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून आहे. यासोबतच गेल्या निवडणुकीत भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेकडून लढलेले किशोर जोरगेवार यांनी आता काँग्रेसचा हात धरण्याच्या हालचाली वाढविल्या आहे. काँग्रेसश्रेष्ठी मतदार संघात रिस्क घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. या अनुषंगाने लोकसभेच्या धर्तीवर जोरगेवार यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे समजते. परंतु जोरगेवार यांनी शिवसेना सोडली खरी पण काँग्रेसमध्ये अद्याप प्रवेश न घेतल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला पक्षातील काही मंडळींकडून विरोध होत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश धानोरकर हेही शिवसेनेतूनच आलेले आहे. शिवसेनेत असताना या दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याचे सर्वश्रूत आहे.
या संबंधावरही जोरगेवारांची काँग्रेस तिकीट बरीच अवलंबून आहे. लोकसभेत भाजपला अडचणीत आणणाºया वंचित बहुजन आघाडीकडून एकही चेहरा पुढे आला नसला तरी युती व आघाडीतील राजकीय घडामोडींमुळे निवडणूक चुरशीही होईल असे चित्र आहे.

मतदार संघातील आमदार
१९६२ - रामचंद्र पोटदुखे (अपक्ष)
१९६७ व १९७२- एकनाथ साळवे (काँग्रेस )
१९७८ व १९८० - नरेश पुगलिया (काँग्रेस)
१९८५ व १९९० - श्याम वानखेडे (काँग्रेस)
१९९५, १९९९ व २००४ - सुधीर मुनगंटीवार(भाजप)
२००९ व २०१४- नाना श्यामकुळे (भाजप)

Web Title: Race for candidacy in Chandrapur; Suspended lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.